Thursday, 2 July 2020

कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा च्या माध्यमातून कोशिंबळे येथे कृषी संजीवनी सप्ताह.!

कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा च्या माध्यमातून कोशिंबळे येथे कृषी संजीवनी सप्ताह.!


      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) आज दिनांक १/७/२०२०रोजी माणगांव तालुक्यातील कोशिंबळे या गावांमध्ये कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन कृषि विभाग व डॉ.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या मार्फत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला.       
      सदर कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमात माणगांव तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून    शेतकर्यांच्या बांधावर आंबा कलमे लावून,त्यांना भात, भुईमूग, आंबा अशा विविध पिकांवर सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले.तसेच पुढील दिवसात एकात्मिक शेती पद्धती,बीज प्रक्रिया,माती परीक्षण,किड रोग व्यवस्थापन, फळबाग, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान,बहुपिक पद्धती, कडधान्ये लागवड आंतरपिके, मसाला पिके,हायड्रोफोनिक्स, आंबा काजू पुर्नज्जीवन अशा विविध विषयांवर कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ.मनोज तलाठी यांनी सखोल मार्गदर्शन केले.    
      सदर कृषी संजीवनी सप्ताह    कार्यक्रमाला माणगांव तालुका कृषी अधिकारी श्री.पी बी नवले, कृषी अधिकारी श्री.के.ए.पडवळकर,श्री.के.जी.शिंदे,श्रीम.आर.यु.गुरव यांनी कृषी विभागाच्या विविध योजना चे मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...