Thursday, 2 July 2020

"मुरबाड मध्ये माजी महसुलमंत्री शांताराम घोलप यांच्या जयंती निम्मित्ताने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप"!

"मुरबाड मध्ये माजी महसुलमंत्री शांताराम घोलप यांच्या जयंती निम्मित्ताने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप"!


मुरबाड ( मंगल डोंगरे ) मुरबाड चे सुपुत्र व माजी महसुलमंत्री कै. शांताराम भाऊ (बापु) घोलप यांच्या जयंती निम्मित्ताने  1 जुलै 2020 रोजी  मुरबाड मध्ये मोफत शिवभोजन थाळीचे वाटप काॅंग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच युवक काॅंग्रेसचे गणेश देशमुख, आद. राहुलजी गांधी विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, शहरअध्यक्ष गणेश खारे, महाराष्ट्र राज्य मराठी  पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष गायकर,  सचिव  दिलीप पवार ,समता सामाजिक फाऊंडेशन चे अध्यक्ष  शंकर करडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.                          कै. शांताराम (बापु) घोलप ह्यांनी मुरबाड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गरज मिटावी म्हणुन असंख्य पाझर तलाव बांधले, शिक्षणाची समस्या सुटावी म्हणुन जनसेवा शिक्षण मंडळाची स्थापना केली. आणि रोजगार देण्यासाठी तालुक्यात MIDC ची स्थापना केली. त्यांच्या जयंती निम्मित्ताने समाजोपयोगी व कोराना प्रादुर्भाव टाळण्यासंर्दभातील सर्व नियम पाळुन मुरबाड शहरातील शिवभोजन थाळी केंद्रावर २०० गरजुनां मोफत थाळी वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याच्या यावेळी चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले.

No comments:

Post a Comment

ठाणे जिल्हयातील चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली हा दोन नॅशनल हायवेनां व औद्योगिक क्षेत्राला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सदर रस्त्या...