सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यथा शासनाच्या लक्षात कधी येणार ? भुषण पाटील
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) मी एक महसुल कर्मचारी आहे. हे सांगायला खरच खुप अभिमान वाटतो हे बोलतांना छाती खरच २ इंच फुगल्या सारखी वाटते किंबहुना फुगतेच तालुक्यात महसुल कर्मचारी आहे म्हणुन खुप मान मिळतो. पण खरच हे सगळ मिळत असतांना हाच महसुल कर्मचारी कोणत्या गोष्टी पासुन लांब जातोय का की स्व़:ता च्या मनाची समजुत काढुण घेतोय…… हयाचा विचार करण्याचा तरी त्याला वेळ आहे का….. खुप विचार केला आणि मग मला उत्त़र मिळाल म्हणुनच लेखाच नाव दिल व्यथा सरकारी कर्मचाऱ्याची
आम्ही कर्मचारी खुप पगार घेतो आम्ही संप केला किंवा नाही केला तरी आम्हाला पगारात खुप भरघोस वाढ करुन मिळते अस सांगितल जात आणि तस दाखवल ही जात पण आजच्या तारखेला हाच कर्मचारी सकाळी १० ला कामाला सुरवात करतो आणि काम कधी संपेल हे त्याच त्यालाच माहित नसत अहो रात्र काम करुन आमच्या लिपीका १६ ते १७ हजार रुपयाचा भरघोस पगार दिला जातो खरच या तुटपुंज्या पगारात त्याच कुटुंबाच तो पालन पोषण योग्य़ प्रकारे करु शकतो का?
आमच्या व्यथा आम्ही मांडायाचा प्रयत्न जरी केला तरी तो प्रयत्न हाणुन पाडला जातो. आमच्या वर बंधन लादली जातात. आणि हाच कर्मचारी याला त्याला भित आज जगत आहे. आज आमच्या कार्यालयान मध्ये आलात तर अर्धा पेक्षा जास्त् जागा रिक्याम्या आहेत एकाच कर्मचाऱ्या कडुन २ ते ३ विषयांचे काम करुन घेतले जाते का तर कर्मचारी नाहीत कर्मचाऱ्यांची भरती नाही. एकीकडे बेरोजगार तरुण नोकरी धंदा नाही म्हणुन आंदोलन करतायेत तर सरकारी कर्मचारी पदे भरा म्हणुन आंदोलन करतायेत एकदंरीत आम्ही आत कार्यालयात बसलेले कर्मचारी आणि आणि बाहेर असलेले आमचेच बेरोजगार तरुण/तरुणी यांचे म्ह़णणे एकच आहे.
पण त्यांचा समान विचार मात्र करतांना दिसत नाही. आपले म्ह़णणे मांडण्याच्या पध्दंती जरी वेगवेगळया असल्या तरी म्ह़णणे मात्र एकच आहे. हे कधी तरी कोणाच्या लक्षात येईल का ? अनेक वक्ते सतत आपल्या भाषणात सर्रास कथन करतात सरकारी बाबु ना फार भरमसाठ पगार आहे. त्यांना ७ वा वेतन आयोग देऊ नका आज मी समाजा प्रश्ऩ विचारतो हिच का ती समता आणि समानता आणि बंधु भावाची प्रतिज्ञा आज शेतकरी कर्ज माफी होते कींवा दुसरी कुठली मदत समाजाला दिली जाते त्या वेळेस सरकारी अधिकारी/कर्मचारी यांचा एक दिवसाचा पगार देण्याचे आव्हान केले जाते त्या वेळेस आम्ही आमचा एक दिवसाचा पगार आमच्या बांधवांना हसत हसत देतो. कारण भारत माझा देश आहे. हया प्रतिज्ञेची आठवण आम्हाला होते. मदतीला माझा किंवा माझया अधिकारी/कर्मचारी बांधव/भगीनींचा विरोध मुंळीच नाही कारण ते आमचेच बांधव आहेत. आणि आमच्यास बांधवानवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर तो आम्ही सहन करुनच शकत नाही फक्त़ एकच माफक अपेक्षा आहे. समाजातील एतर घटकांनी देखील आमच दु:ख समजुन घ्याव.
आम्ही जे काम करतोय ते समाजाच आहे. आम्हाला देखील एक परिवार आहे. रात्री कामावरुन १०,११ वाजता घरी जातांना आमच्या मनात नेहमी भिती असते आज केलेल काम बरोबर असेलना, काही चुकल तर नसेल उदया वरिष्ठ़ अधिकारी तपासणीला तर नाही ना येणार उदया मी नोकरीत असेन ना हे असे असंख्य़ प्रश्ऩ डोक्यात येऊन मेंदुचा पार भुगा होऊन जातो. आणि घरी गेल्यावर जेवण करुन झोपतांना परत हेच प्रश्ऩ असतात रात्र घरी गेल्यावर आमची पोर बाळ झोपलेली असतात आमच्या मुलांना आम्ही सकाळी आणि रात्री झोपेतच पाहतो पंप्पा आज घरी लवकर या आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जा अस जेव्हा आमची मुल आम्हाला फोन करुन सांगतात आणि लगेच कार्यालयात फोन येतो. आत्तांच मेल केला आहे. त्याची माहिती तातडीने दया नाहीतर वरिष्ठांना आपण माहिती दिली नाहीत असे सांगण्यात येईल.
मग मुलांचा पप्पा लागतो कामाला वरिष्ठांचा आदेश सर आखोपर नोकरी टिकावयची आहे मुंलाच्या भविष्यांचा विचार करत तो बाप मर मर काम करत राहतो. आणि मुल झोपली की जातो रात्रीचा घरी जेवतो आणि अंथरुणात पडतो घरातल्यांना वाटत की हा झोपला पण बाप, मुलगा, पति परमेश्व़र आणि एक कर्मचारी म्हणुन आयुष्यात अश्या भुमीका बजावत असतांना त्याची होत असलेली ओढाताण आणि स्व:त च मन मारुन जगत असलेला हा माणुस झोपलेला नसतो तर मनातल्या मनात घाती फोडुन रडत असतो हे खरतर कोणाला नाही समजु शकत…… शेवटी सकाळ होते आणि परत कार्यालयात जाण्याची घाई सकाळी घरातुन निघतांना याची शास्वतीच देण्यात येत नाही की मी परत येईन…………… आलोच नाही तरी?
हे सगळ कश्यासाठी तर कुटुंबा साठी यातच सार आयुष्य़ निघुन जात. खरच हि विदारक आणि भयानक परिस्थ़ती आज सरकारी अधिकारी/कर्मचाऱ्यांची यांची आहे……………….
मागील काहि महिन्यात आमच्या जिल्हयातील ४ कर्मचारी यांच ह्रदय विकाराऱ्या झटक्याने निधन झाला बातमी समजली आणि पाया खालची जमीनच सरकली ३० ते ४० वयोगटातील आमचे बांधव असे अचानक कसे गेले? हाच प्रश्ऩ मनात सारख घोगावत होता. आणि मग लक्षात आल सतत मनावरील ताण याच मुळे आज आमचे कर्मचारी दगावत आहेत अस कुठे तरी वाटुन गेल.
आज मी हा लेख लिहीलाय कदाचीत माइ-या वर मी व्यवस्थेवर टिका केली म्हणुन कारईवाई होईल किंवा नाही मला माहित नाही. पण मला माझ मत व्यक्त् करण्याचा अधिकार आहे आणि तो मला भारतीय घटणेने दिला आहे. मला माझया कडे असलेल्या अभिव्यक्ती स्व:तत्राचा अभिमान आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय भारत जय महाराष्ट्र.

No comments:
Post a Comment