मुरबाड मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना विविध वस्तू वाटप करून अजितदादा पवारांचा वाढदिवस साजरा !!
मुरबाड (मंगल डोंगरे ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचा वाढदिवस आज संपूर्ण महाराष्ट्रात अगदी साधेपणाने साजरा होत असताना, त्याचेच औचित्य साधुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर शाखेच्या माध्यमातून लहान मुलांना खाऊ आणि विविध वस्तुंचे वाटप वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मा.श्री.प्रमोदजी हिंदुराव साहेब, प्रदेश सचिव मा.श्री.कॅप्टन आशिषजी दामले साहेब, ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मा.श्री. दशरथजी तिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे कणखर व खंबीर नेतृत्व,स्पष्ट वक्ते, दूरदृष्टीचे सुजाण नेते,महाराष्ट्रातील जनते प्रती विकासाची दृष्टी असणारे, जनतेच्या हक्कासाठी व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्परतेने कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व,जनता म्हणजेच सार्वभौम मानणारे, सर्वसामान्यांचे नेते,आमचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री *आदरणीय,श्री.अजितदादा पवार* यांच्या वाढदिवसा निमित्त शहर शाखेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील बारवी डॅम शेजारीच असणा-या परंतु ज्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी चांगला रोड नाही .आणि दुर्लक्षित असणा-या अश्या तळ्याची वाडी व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना व लहान मुलांना यावेळी
केक, चॉकलेट, बिस्कीट, कॅडबरी, कुरकुरे चिप्स यासारखे खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिपक वाघचौडे, मुरबाड शहर सेवादल सेलचे अध्यक्ष शिवाजी नवले, शहर सरचिटणीस आशिष तेलवणे वाडीतील ग्रामस्थ, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment