Thursday, 23 July 2020

मुरबाडची भाग्यश्री तोंडलीकर ठरली, मिस युनिव्हर्स !! "दै.बातमीदार चे पत्रकार मंगल डोंगरे ,यांचे सोबत झालेली मुलाखत"

मुरबाडची भाग्यश्री तोंडलीकर ठरली, मिस युनिव्हर्स !!    
   
"दै.बातमीदार चे पत्रकार मंगल डोंगरे ,यांचे सोबत झालेली मुलाखत"


मुरबाड ( मंगल डोंगरे )  
    मुरबाड तालुका हा तसा  जवळजवळ बहुतेक कलाकारांचं माहेर घर असून अनेक नामवंत कलाकार, गीतकार, संगीतकार  याच मुरबाडच्या मातीतून नावारूपाला आले आहेत. मुरबाड ची ओळख तशी पाहता फार जुनी आहे   त्यातच नव्याने नावारूपाला आलेली भाग्यश्री अजय तोंडलीकर  तिला नुकताच सहा महिन्यापूर्वी मिस युनिव्हर्स हा भारत देशाचा किताब मिळाला आहे .भाग्यश्री चा प्रवास तसा खडतरच मुरबाडच्या ज्ञानदीप शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण , नंतर सुयश कॉलेजमध्ये  15 वी पर्यंत तर मुरबाडच्या न्यू इंग्लिश स्कूल पर्यंत तिचा शालेय प्रवास नंतर मॉडेलिंग क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवून अनेक नॅशनल पुरस्कार तिने प्राप्त केले आहेत. तर 2019 चा मिस दिवा इंटरनॅशनल विनर ,मुंबई फास्ट एव्हिएशन मॅनेजमेंट 2018,   मिस युनिव्हर्स 2019 असे  अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. परंतु ती  प्रसिद्धीच्या झोतापासून अलिप्त राहिल्याने मुरबाडकर  अनेक वर्तमान पत्राच्या,युट्युब चँनेलच्या  मुलाखती नंतर  भाग्यश्री च्या डोक्यावर मानाचा तुरा नक्कीच चढवतील अशी आशा मुरबाड आज दिलेल्या मुलाखती द्वारे दिसून येत आहे .यावेळी दैनिक पुढारीचे ,मुंबई तरुण भारत,  जीवनदीप वार्ता यांनीही तिची मुलाखत घेऊन एक आधार दिला आहे.त्यानंत दै.लोकगाथा,दै.ठाणे वैभव,दै.बातमीदार,साठी ही तिने मुलाखत दिली आहे.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...