Thursday, 23 July 2020

आम आदमी पार्टी व श्रमिक विकास संघटना रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा !

आम आदमी पार्टी व श्रमिक विकास संघटना रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा !


कल्याण : देशावर आलेले कोरोनाचे संकट व सरकारने लोकांचा जीव वाचवण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाऊन यामुळे गोरगरीब मजुर तसेच हातावर पोट असणाऱ्या लोकांचे खूप हाल झाले.

.
असाच एक वर्ग रिक्षा व टॅक्सी चालकांचा हे सुद्धा रोज काम करणार तरच उदरनिर्वाह ठिकपणे चालवू शकणार ‌लॉकडाऊनच्या काळात यांचा रोजगार बंद असल्याने घरखर्च कसा करायचा ही विवंचना तर बऱ्याच रिक्षा व टॅक्सी यांवर असलेले बॅंक लोण रोजगार बंद असल्याने थकलेले हप्ते काही रिक्षा व टॅक्सी मजबूरीने बाहेर काढली असता झालेल्या केसेस या सर्व मागण्यांचा विचार करून आम आदमी पार्टी व श्रमिक विकास संघटना यांनी कल्याणचे तहसीलदार यांना  आज २३/०७/२०२० रोजी निवेदनाद्वारे रिक्षा व टॅक्सी व्यवसाय पूर्ववत चालू करणे, गाड्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ वाढवून देणे, तसेच लॉकडाऊनच्या काळात रिक्षा व टॅक्सी चालकांवर झालेल्या केसेस मागे घेण्यात यावे. तसेच मागण्या मान्य नाही झाल्या तर उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. या निवेदनाच्या प्रती १) मा. अतिरिक्त आयुक्त, क.डो.म.पा. २) मा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांना देण्यात आल्या. 
यावेळी निवेदन देण्यासाठी निलेश व्यवहारे, संदिप नाईक, रफिक शेख, सचिन जोशी, निलेश गवई इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...