मुरबाड तालुक्यातील गोरगरिबांचा देवदूत म्हणजेच डॉ. नरहरी फड,,
मुरबाड (मंगल डोंगरे )
गेल्या चार महिन्यापासून एकमेव कोरोनाची दहशत पसरली असल्याने साथीच्या रोगावर उपचार करण्यासाठी ,रुग्ण दवाखान्यात जाण्याचं टाळतात त्यातच खाजगी डॉक्टर उपचार करण्यास तयार होत नसल्याने मुरबाड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना एकमेव आधार म्हणजे डॉ. नरहरी फड हे डॉक्टरी रूपातील देवदूतच म्हणून आपली सेवा बजावताना दिसून येतात .मुरबाडच्या शासकिय रुग्णालयात नेहमीच जणू जत्राच भरल्या सारखे पाहवयास मिळते.
मुरबाड रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी डॉ .नरहरी फड म्हणजे एक वेगळे रसायन म्हणावं लागेल. डॉक्टर हा रुग्णासाठी देवदूत म्हटले जाते परंतु सध्याची तालुक्यातील खाजगी डॉक्टर हा रुग्णासाठी बोगस लॅब वाले आणि मेडिकल स्टोर ह्या तिघांनी जणू वाट पाड्याचा मार्ग अवलंबिला असून रुग्णांना सेवा देण्याऐवजी
जणू काय वैद्यकीय पेशाचा धंदा चालविला आहे.रुग्ण हातात सापडला की प्रथम त्याच्या विविध चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. मग विविध थेरपीचा अवलंब केला जातो. मोठ मोठे डॉक्टर यांचे शिक्षण बघितले तर
Bhms , dhms ह्या डॉक्टरांकडे रुग्णावर उपचार करण्यासाठी तज्ञडॉक्टर भाड्याने किंवा मजुरीने मागविले जातात. म्हणजे खरोखराच रामभरोसे उपचार परंतु रुग्णांना देखील पर्याय नसल्याने यांचेकडे धाव घ्यावी लागते .अशा ह्या सर्वत्र लूटमार चाललेल्या तालुक्यात शासकिय रुग्णालयास लाभलेले डॉ. नरहरी फड हे इमाने इतबारे आपली सेवा बजावताना दिसतात. दिवसभर या रुग्णालयात किमान ४०० ते ५०० रुग्णांची opd होते . यात साथीचे रुग्ण ,अबालवृद्ध ,गरोदर महिलांच्या डिलिव्हरीज अशा अनेक रोगांवर गोरगरिबांना योग्य सेवा देण्याचे काम डॉ. फड करीत असले ,तरी गेल्या चार महिन्यात कोरोनाच्या कहराने मनुष्यच मनुष्याचा तिरस्कार करताना दिसून येतो. एक दुसऱ्याला जितका लांब ठेवावा हे जोपासतो.
साध्या सर्दी तापावर देखील उपचार करण्यासाठी खाजगी डॉक्टर धजावत नाहीत. अशा शेकडो रुग्णांना डॉ.फड आपल्या परीने तपासून योग्य उपचार देतात . सदैव रुग्णाच्या गराड्यात असलेल्या ह्या देवदूतास कोरोना देखील बाधा होण्यास घाबरतो. असे म्हटण्यास वावगे ठरणार नाही. डिलिव्हरी असो कि, सर्पदंश असो, डिसेंटरी अपघात असो की इतर कोणताही आजारावर दिवसारात्री हमखास सेवा मिळण्यास एकमेव ठिकाण म्हणजे डॉ.फड होय.
गेल्याचार महिन्यात कोरोनाच्या कहरान इतर साथीच्या रोगावरील रुग्णांना उपचारा अभावी मरणासन्न अवस्था असतांना खाजगीत लूट तर ,उपचारा अभावी मृत्यूची गाठ अशा अत्यंत भयानक युद्धजन्य परिस्थितीत गोरगरिबांना देवदूत ठरतात ते डॉ.नरहरी फड होय.
---------------------------------------
**** एक दिन जानारे भाई - रुग्णांची सेवा बजावताना डॉक्टरचं जर घाबरायला लागला तर गोरगरिबांनी कुणाकडे जायचं. तुम्हीच सांगा हिच तर खरी देश भक्ती .जनसेवा आता नाही बजावाची तर कधी - डॉ.नरहरी फड - ८९८३०९११११

No comments:
Post a Comment