कल्याणच्या श्वास हॉस्पिटलने पाळला माणुसकीचा धर्म ! "प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती मागणी"
कल्याण : सध्या कल्याण डोंबिवलीतील वाढती रुग्ण संख्या त्यामुळे उद्भवलेल्या समस्या, महानगरपालिकेकडून दिल्या गेलेल्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.
कल्याण मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकाला कोरोनाची बाधा झाली. महानगरपालिकेमध्ये कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णाला उपचारासाठी खाजगी श्वास या रुग्णालयात दाखल केले. सदर रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने या रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना परिस्थिती व खर्चाची जाणीव करून तत्काळ उपचार केले ! सदर रुग्णावर १६ दिवस व्यवस्थित उपचार केल्यामुळे प्रकृती सुधारली. गंभीर परिस्थितीतील रुग्णावर १६ दिवस उपचार केल्यामुळे वाढीव बिल आले.
त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी परिस्थिती नसल्याने वाढीव बिलासंदर्भात थेट राज्यमंत्री बच्चु कडू यांच्याकडे तक्रार नोंदवली. राज्यमंत्री बच्चु कडू यांनी लगेच आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील यांना या संदर्भात सदर महिलेस मदत करण्यास सांगितले. जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील यांनी सदर महिलेस प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख आदर्श भालेराव व तालुका सचिव प्रदीप सोनावणे यांना मदत करण्यास सांगितले.
यावर लगेच तालुका संघटक आदर्श भालेराव व तालुका सचिव प्रदीप सोनावणे, मानवी अन्याय निर्मुलन संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष सुवर्णा कानवडे यांनी कल्याण पश्चिम येथील श्वास हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर ढगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका व मागणी लक्षात घेऊन बिलिंग विभागाचे डॉक्टर पाटील यांच्याशी भेट करून दिली असता डॉ पाटील यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी व रुग्णाची परिस्थिती पहाता रुग्णाचे आलेले १६ दिवसांचे बिल त्यात मेडिसिन, लॅब टेस्ट, एक्सरे, डॉक्टर चार्ज, RMO चार्ज, नर्सिंग चार्ज, PPE किट व इतर चार्जेस मिळून होणारे औषधोपचार सहित (३,२५,०००) तीन लाख पंचवीस हजार रुपये आले असते. तरी पण डॉक्टर पाटील यांनी माणुसकीच्या धर्माचे पालन करीत व प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका लक्षात घेऊन (१,३५,०००) एक लाख पस्तीस हजार रुपये कमी करून फक्त (१,९०,०००) एक लाख नव्वद हजार रुपये बिल घेतले.
श्वास हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जी माणुसकी दाखविली व ज्या तत्परतेने प्रहार जनशक्ती पक्षाने दखल घेऊन धाऊन आले व मदत केली यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी श्वास हॉस्पिटल व प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार व्यक्त केले.

No comments:
Post a Comment