'प्रभाग क्रमांक 16 वर पसरली शोककळा. सामाजिक क्षेत्रात काम करणार्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू.'!
कल्याण : कल्याण येथील प्रभाग क्रमांक 16 मधिल भवानी नगर या जुन्या विभागातील सामाजिक व राजकीय पायाभरणीत सिंहांचा वाटा असणार्या *'उतेकर कुटुंबातील'* अजातशत्रू व्यक्तिमत्व, सदैव सर्वांच्या सुखात आणि दुःखात धावून जाणारे *विजय उतेकर* यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या घरातील त्यांची आई व त्यांचे मेहुणे मनसेचे विभागप्रमुख मामा म्हणुन परिचित असलेले *प्रदीप जाधव* हे गेले काही दिवस कोरोना झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची काळजी घेण्यासाठी सततची धावपळ व या रुग्णालयांची सर्व सामान्यांना परवडत नसलेली बिले या ताणाने *विजय उतेकर* यांचा बळी गेला अशी चर्चा या विभागात सुरू आहे. त्यांची म्हातारी आई अजूनही रुग्णालयात दाखल आहे.
त्यानंतर दोनच दिवसात त्यांच्या मोठ्या बहिणीचे पती *प्रदीप जाधव* यांनी कोरोनाशी झुंज देता देता अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनांनी त्यांच्या कुटुंबासह प्रभाग क्रमांक 16 वर शोककळा पसरली आहे. उतेकर कुटुंबातील मेजर हवालदार शंकर उतेकर, दीपक उतेकर, सुनिल उतेकर भवानी नगर परिसरात सामाजिक व राजकीय कामात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. *शिवभक्त* असलेले विजय उतेकर हे नेहमी भगवा टिळा व छातीवर मिरवणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा बिल्ला लावीत असत. मृत्यू समयी सुद्धा छत्रपतींची प्रतिमा त्यांच्या सोबत होती. ते पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 13 चे *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रथम शाखा अध्यक्ष* होते. प्रेमळ स्वभाव व परोपकारी वृत्तीमुळे त्यांच्या प्रेत यात्रेला कोरोना काळात ही मोठा जनसागर लोटला होता.

No comments:
Post a Comment