खोपिवली येथील" चोंढी"धबधब्यावर दोन तरुणांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी म्रुत्यू !!
मुरबाड.(मंगल डोंगरे.)
मुरबाड तालुक्यातील मौजे खोपिवली येथील सह्याद्री पर्वत रांगेतुन उगम पावलेल्या व पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालणा-या "चोंढी " हा.धबधबा पर्यटकांना आकर्षण आहे.दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक गोरखगड ट्रेकिंग साठी येतात. गोरखगड सर झाल्यानंतर हे पर्यटक समोरच असलेल्या या "चोंढी "धबधब्याचा मनमुराद आंनद लुटतात.
मात्र गेल्या दोन वर्षां पासुन पर्यटन स्थळी घडणारे अपघात व अनुचित प्रकार थांबवण्यासाठी जिल्हाधिका-याने सक्त आदेश काढून मनाई केली आहे.तरीही काही हौसे-गवसे पर्यटक हा मनाई आदेश धाब्यावर मारुन धबधब्यांवर जातात.अशाच प्रकारे आज तालुक्यातील मौजे गडगे आंबेळे येथील 6 तरुण निसर्गाचा आंनंद लुटण्यासाठी खोपिवली येथील "चोंढी " धबधब्यावर गेले होते.धबधब्यात उतरल्या नंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण खोलवर पाण्यात बुडाले ,ते वर येत नाहीत म्हणून सोबत असलेल्या मित्रांनी खोपिवली गवात येवून सदर घटनेची माहिती दिली.तेव्हा गावक-यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवुन म्रुत तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.परंतु सतत पडणारा पाऊस त्यात पाण्याचा वाढता ओघ पाहता त्यांना,शोध घेणे शक्य.झाले.नाही. म्हणून सदर घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना देऊन अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.त्यावेळी म्रुत झालेल्या उमेश पांडुरंग बोटकुंडले, वय वर्ष-25 याचा म्रुतदेह हाती लागला .तर अजून एक म्रुत तरुण कार्तिक (बबल्या )याचा तपास लागला नाही. परंतू हाती आलेला म्रुतदेह शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे पाठविण्यात आला आहे.तर कार्तिक(बबल्या)गडगे वय.वर्ष.-25 याचा तपास अग्निशमन दलाचे जवान व मुरबाड पोलीस आणि ग्रामस्थ करत आहेत.


No comments:
Post a Comment