कोकण रेल्वे सोडणार १५ ऑगस्ट पासून गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्या !!
मुंबई : 15 ऑगस्टपासून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी, चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारकडून याबाबत हिरवा कंदिल मिळाल्यानंतर या रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात अप आणि डाऊन अशा 162 गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पहिली रेल्वे सुटणार आहे. शिवाय काही गाड्या या लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात कुर्लावरून देखील सुटणार आहेत.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता ट्रेन्सनं प्रवास करण्याकरता काय नियम असणार याबाबत देखील उत्सुकता आहे. दरम्यान, अद्याप याबाबतची नियमावली समोर आलेली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक स्टेशनवर जिल्हा प्रशासनाचे काही कर्मचारी असणार असून ते येणाऱ्या प्रवाशांची माहिती किंवा त्यांची नोंद ठेवणार आहे.

No comments:
Post a Comment