मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!
कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे :
मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा पटांगणात आयोजित हिंदू संमेलन उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले. हिंदू समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या संमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून यशोदाताई पाटील आणि हर्षदाताई केणे यांनी बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीवर सखोल भाष्य केले. आपल्या हिंदू परंपरेचा आणि महापुरुषांचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला त्यांनी विशेषतः मुलींना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. "लव्ह जिहाद" आणि "लँड जिहाद" सारख्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मुलींनी सावध राहावे, कोणत्याही आंधळ्या प्रेमाला बळी पडू नये, तसेच पालकांनीही जागरूक राहण्याचे आवाहन केले.
वक्त्यांनी हिंदू धर्माची महानता पटवून देताना इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांची उत्तम छान मांडणी करत उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी आणि येसूबाई यांनी हिंदू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुलजी मिश्रा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदू समाजातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकमेकांना मदत करून सुखदुःखात एकत्र राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील ऐक्य आणि परस्पर सहकार्य यामुळेच समाज अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन देवसर यांनी उत्कृष्टरीत्या केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या संमेलनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता, एकजूट आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
No comments:
Post a Comment