पत्रकार मंगल डोंगरे यांना" भाजपा महिला मोर्चाचा कोरोना योद्धा "जिल्हा स्तरीय पुरस्कार प्रदान !!
मुरबाड (प्रतिनिधी) : गेल्या तिन-चार महिण्यां पासुन जगाच्या पाठीवर उद्भवलेल्या कोरोना सारख्या महामारीच्या संकटात संपूर्ण जग सापडले असताना, महाराष्ट्राच्या कोना-कोपरा ही या संकटाने सोडला नसुन,शहरी भागापासुन ते खेडेपाड्यातही धुमाकुळ घातला आहे.अशा कठीण प्रसंगी पत्रकार श्री. मंगल डोंगरे, यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन,नगरपंचायत प्रशासन यांनी जनतेसाठी दिलेल्या सुचना, आदेश,निर्देश, जनते पर्यंत पोहचवुन, जनतेला, वारंवार, साबणाने हात धुवणे,सँनिटायझर वापरणे,सामाजिक सुरक्षितता पाळणे,तोंडाला मास्क अथवा रुमाल लावणे, अशा प्रकारे सावध करून जनजागृती चे कार्य केले.तसेच लाँकडाऊन काळावधीत गोरगरीब मजुरांना अन्न धान्य, तसेच जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले,प्रवासात अडकलेल्या प्रवाशांना चहा, नाष्टा,जेवणाची व्यवस्था केली,त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करुन दिली. कित्येक परप्रांतीय मजुरांना मोफत वैद्यकीय तपासणी दाखले,प्रवासी पास मिळवून देण्यासाठी मदत केलीे, आणि सर्वसामान्य माणसाला कोरोना आजार होवु नये म्हणून बहुमूल्य काम केले आहे.त्याची दखल घेवून रक्षा बंधनाच्या पवित्र पर्वावर कोव्हिड -19,या संकट काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील तैनात असलेल्या कोव्हिड योद्ध्यांना रक्षा बंधनाच्या पवित्र पर्वावर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ठाणे जिल्ह्याच्या वतीने एकूण 3 हजार व्यक्तींना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्याचा संकल्प असुन,ज्यामध्ये डॉक्टर , नर्स,आरोग्य कर्मचारी,सफाई कामगार, पोलीस दल,कर्मचारी अधिकारी, बँक कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आशा स्वयंसेविका,याप्रमाणे. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असुन, हे पुरस्कार सोशियल अंतर राखण्यासाठी प्रत्यक्षात घरोघरी जावून देण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने आज मुरबाड तालुक्यात केवळ पत्रकारिताच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शहरातील पत्रकार मंगल डोंगरे यांना जिल्हा स्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार देवून महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गौरविण्यांत आले.यावेळी ठाणे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितलताई तोंडलीकर,नगरसेविका उर्मिलाताई ठाकरे,भाजपा कार्यकर्ते सुजित ठाकरे,मनसे मुरबाड शहर उपाध्यक्ष विलास हुमणे हे उपस्थित होते.यांनी सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन केले.आता पर्यंत एक राज्य स्तरीय ,व एक जिल्हा स्तरीय कोरोना महायोद्धा पुरस्कार मिळाल्या बद्दल पत्रकार मंगल डोंगरे यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment