ऐन पावसाळ्यात गोवेली ग्रामीण रुग्णालयात पाणी टंचाई कोरोनोच्या काळात स्वच्छतेचे संकट कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात?
कल्याण (संजय कांबळे) : कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात अंत्यत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयात सध्या ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली असून कोरोनोच्या परिस्थितीत स्वच्छता कशी राखायची असा मोठा प्रश्न वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतावत आहे. यामुळे यांचेच आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कल्याण तालुक्यात गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी सन 1992 च्या आसपास ग्रामीण रुग्णालचा विस्तार झाला. साधारणपणे 70ते 80गांवासाठी हे रुग्णालय वरदान ठरत आहे. डाॅक्टर कांबळे, डॉ, इंगळे, डॉ, केम्पीपाटील, डॉ रोहिदास वाघमारे, डॉ परमार असे अनेक नामांकित वैद्यकीय अधिकारी येथे सेवा देऊन गेले आहेत. सध्या डॉ कापूसकर हे सेवा देण्याचे काम करीत आहेत. या रुग्णालयात 30 बेड असून पुरुष वार्ड, स्त्री कक्ष,प्रसूती कक्ष, रक्त, लघवी थुंकी तपासणी विभाग, औषध पुरवठा, असे अनेक विभाग व कक्ष सुरू आहेत.
सध्या सर्वच ठिकाणी कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासन हादरून गेले आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रकारचे उपाय योजना करण्याचे शासन सांगत आहे. यावर अद्यापही लस न आल्याने स्वत काळजी घेण्यास प्राधान्य देण्यात येते. यामध्ये सोशलडिस्टींग, मास्क वापरने आणि वारंवार हात साबणाने धुणे अंत्यत आवश्यक माणले जाते. परंतु यासाठी पाणी भरपूर लागते आणि रुग्णालयात तर पाणी अत्यावश्यक आहे. कारण रुग्णालयात तर वेगवेगळ्या प्रकार चे पेंशंट येत असतात. त्यांना तपासणी केल्यानंतर हात स्वच्छ धुवून पुन्हा कार्यासाठी तयार रहावे लागते. त्यातच सॅनिटायझर चा अति वापर हा त्वचेसाठी धोकादायक मानला जातो.
असे असताना गोवेली ग्रामीण रुग्णालयात गेल्या 15 दिवसापासुन पाणी नाही. त्यामुळे येथील कर्मचारी कसेबसे पावसाच्या पाण्यावर आपली गरज भागवत आहेत. रुग्णालयाच्या फलकावर रग्ण कल्याण समिती दिसते पण ते नक्की कोणाचे कल्याण करते हे कळायला मार्ग नाही. आपल्या रुग्णाला वेळेवर उपचार नाही मिळाला, त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर पायलीचे पन्नास लोकप्रतिनिधी, स्वयंघोषित नेते, कार्यकर्ते तथाकथित पत्रकार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तुटून पडतात. पण कोरोना सारख्या महामारीत देखील सिमेवरील सैनिकाप्रमाणे कोव्हीड योध्दे म्हणून सेवा करणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे, त्यांच्या अडचणी, समस्यांचे काय? याचा विचार व्हायला नको का? त्यामुळे वैधकिय सेवे सारख्या अत्यावश्यक सेवा देणा-या रुग्णालयात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई हे आपल्या तालुक्यासाठी नक्कीच भूषणावह नाही.

No comments:
Post a Comment