मुरबाड पंचायत समिती कार्यालयात श्रमजिवीचा संघटनेचा जागतिक आदिवासी दिन साजरा...*
मुरबाड (मंगल डोंगरे) :
मुरबाड तालुक्यातील श्रमजीवी संघटनेनी जागतिक आदिवासी दिनाचे दिवशी आँनलाईन शिक्षण धोरणाबद्दल शिक्षण मंत्र्यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम व विद्यार्थ्यांना लागणारी साधने घेण्यासाठी येत असल्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राज्यात कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व व्यवस्था कोलमडली असून राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला आहे. राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नसल्याने दिनांक १५ जून २०२० रोजी पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. महाराष्ट्रातील सर्व शाळा टप्प्या टप्याने सुरू करण्याचे वेळापत्रक देण्यात आले. आँनलाईन शिक्षणाचा पर्याय जरी स्वागतार्ह असला तरी ज्यांच्या कडे लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल, रेंज, रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत .अशीच श्रीमंतांची पोरं शिक्षण घेत आहेत. परंतू आमच्या तालुक्यात दोन वेळचे अन्न घरात खायला नाही. रोज मजूरी केल्याशिवाय जगायचं कसं याची चिंता आहे. ज्या मुलांच्या आई-वडीलांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही अशा गरीब आदिवासी मुलांनी कसे शिकायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय संविधानाने आम्हाला शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे.प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे आँनलाईन शिक्षण पध्दतीचा विचार करता आपण प्रत्येक गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांला शालेय शिक्षण घेण्याकरिता लागणारी शैक्षणिक साधने व साहित्य तात्काळ देण्याची तजवीज केली असेलच याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला माहिती आहे फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, शाहूमहाराज यांचे नाव घेऊन शिक्षण मंत्री सत्तेत बसला आहात. त्यामुळे आपण आदिवासी मुलांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवणार नाहीत. त्यांना येणाऱ्या सर्व अडचणी आपण सोडवाल याची खात्री आणि विश्वास आम्हाला आहे.
आज पंचायत समितीत झालेल्या या कार्यक्रमासाठी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस मा. दशरथ भालके, सचिव दिनेश जाधव, पंचायत समिती सभापती मा. श्रीकांत धुमाळ, गटविकास अधिकारी रमेश अवचार, व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment