वडाळ्यातील सिध्दीविनायक हौसिंग सो. एसआरए प्रकरणात विकासक जैन यांची माजी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून गुंडागर्दी !!
"गृहनिर्माण मंत्र्यांनी घालावे लक्ष जनतेची मागणी अन्यथा आत्मदहनाचा इशारा !
मुंबई, प्रतिनिधी,:
मुंबई येथील वडाळा परिसरातील गणेशनगर येथील भुखंड क्रमांक १९२, १९४, १९५ मधील १५३ झोपडी धारक यांच्या विकासासाठी सिध्दीविनायक हौसिंग सोसायटी स्थापन करुन एसआरए अंतर्गत ७ वर्षांपूर्वी स्थापन केली. या नंतर यांच्या विकासाकरिता आतापर्यंत तीन विकासक आले सुरवातीला १०० झोपड्या निष्कासित करून उर्वरित ५३ टाटा पॉवरच्या इलेक्ट्रीकल लाईन खाली असल्याने सदर झोपड्या न हटविता विकास करण्याचे योजिले होते. तसेच तीन वर्षात ताबा देऊ असे आश्वासन दिले पण फक्त विकासक बदलले.
आता आलेले तिसरे विकासक जैन तसा कोणताही तात्त्विक विरोध नसताना व सध्याची परिस्थिती देशावर व जगावर आलेले कोरोनाचे संकट त्यात लॉकडाऊन त्यामुळे एकीकडे जिवाची भिती तर कामधंदे बंद असल्याने ओढावलेली गोरगरीब जनतेवर ओढावलेली बिकट परिस्थिती असा कोणताही सुज्ञ विचार न करता सध्या कोणताही अधिकार नसलेले संस्थेचे माजी पदाधिकारी व परिसरातील स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती यांच्याशी संगनमत करून ५३ झोपडी धारकांना कोणतेही लेखी स्वरूपात आश्र्वासन न देता, जबरदस्तीने खाली करण्यास दबाव टाकत आहे.
नागरिकांनी या विरुद्ध स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिलेल्या आहेत तरी सदर विकासक जैन याची पर्वा न करता दबाव वाढवित आहे. यावर नागरिकांनी माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यात लक्ष देऊन मार्ग काढावा अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

No comments:
Post a Comment