Sunday, 20 September 2020

अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात अवैध सावकारीचे जाळे मोठ्या प्रमाणावर..

अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात अवैध सावकारीचे जाळे मोठ्या प्रमाणावर..


उल्हासनगर, प्रतिनिधी : अंबरनाथ, उल्हासनगर शहरांची ओळख औद्योगिक शहरे म्हणून ओळख आहे, या शहरात कामगार व छोटे मोठे व्यवसाय करणारा वर्ग असा गरीब व मध्यमवर्गीय समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा फायदा घेऊन विनापरवाना सावकारीचा धंदा चालवून महिना १५ ते २० टक्के व्याजाने पैसे देऊन हे अवैध सावकार गब्बर व मुजोर झाले आहेत.
ह्या अशा अवैध सावकारांमुळे कित्येक संसार उध्वस्त झाले आहेत तर कित्येकांनी आपले जीवन संपविले आहे अशा सावकाराकडून महिलांवर अत्याचार झालेल्या घटना सुध्दा उघडकीस आलेल्या आहेत.
आता ओढावलेले कोरोनाचे संकट लॉकडाऊन यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कारखाने बंद असल्याने रोजगार बुडाले, अनेक घरमालकांनी लॉकडाऊनच्या काळातील घरभाडे माफ केले तर सरकारने सांगितलेल्या नुसार बॅंकांनी सवलत दिली पण जसा जसा लॉकडाऊन मधे शिथिलता दिली तसे या अवैध सावकारी करणाऱ्यांनी आपले खरे निर्दयी रुप दाखविण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळातील व्याज व दंड जोडून अव्वाच्या सव्वा रक्कम मागण्यास सुरवात केली आहे अजून लोकांचा रोजगार व्यवस्थित सुरू नाही वर यांची दमदाटी अगदी घरी जाऊन अपशब्द वापरणे सुरू केले, गरीब कामगार, घरच्यांचे पोट मारून यांना घाबरून पैसे भरतो आहे नसतील तर मार खातो व शिव्या तर नेहमीच.
असे अवैध सावकारी व्यवसाय करणारे गुंड प्रवृत्तीचे व निर्दयी स्वरूपाचे असतात, अशा सावकरांकडे बऱ्याचदा सर्व सामान्य व्यक्ती मजबूरीमुळे जशी वैद्यकीय गरज, मुलांचे शिक्षण किंवा काही घरगुती अडचणी यामुळे जातो त्या गोष्टीचा फायदा घेऊन हे सावकार महिना जे १५ ते २० टक्के व्याजाने पैसे देतात त्यासाठी त्यांचे कोरे धनादेश घेणे, घराचे पेपर घेणे, कोऱ्या स्टॅंप पेपर तसेच कोऱ्या कागदांवर सह्या घेतात नंतर मुद्दल किंवा व्याज थोडासा उशीर झाला तरी त्यांना धमकावणे, मारहाण करणे, त्यांच्या घरी जाऊन बायका मुलांना अपशब्द वापरणे किंवा शिवीगाळ करणे परत जवळ असलेल्या कागदपत्रांच्या आधारे तुला पोलीस स्टेशनला जमा करीन, माझी सर्वांशी ओळख आहे अशी धमकी देतात. सर्व सामान्य कर्जदार हा ह्या अवैध सावकारांचा अत्याचार त्यांच्या भितीने व परिवाराच्या काळजीने निमुटपणे सहन करतो व तक्रार करायला घाबरतो.


अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन यांची माहिती जमा करून व खंबीर पावले उचलून अशा अवैध सावकारांचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...