कल्याण (संजय कांबळे) : कोरानाच्या जागतिक महामारीच्या संकटात, गोरगरीब, शेतमजूर,, कष्टकरी, आदीवाशी यांच्या तोंडसा 'घास,हिराऊन घेणा-या शिधावाटप दुकानदारांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मानिवली गावातील ग्रामस्थ एकवटले असून रेशनदुकानदार चिंतामण रामा भंडारी यांचा परवाना रद्द करण्याची लेखी मागणी कल्याण तहसिलदार दिपक आकडे,यांच्याकडे केली असून अहवाल बनविल्यानंतर कारवाई साठी तो प्रांताकडे पाठविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कल्याण तालुक्यातील मानिवली गावात चिंतामण भंडारी यांचे परवाना धारक रेशनदुकान आहे, गावाच्या आजूबाजूला आदीवाशी वाड्या वसत्या असल्याने हे गोरगरिब, कष्टकरी, शेतमजूर या शिधावाटप दुकानावर अंवलबून आहेत. परंतु जो तळी राखी तो पाणी चाखी या म्हणी प्रमाणे याचा कारभार सुरू असल्याने सन २०१६ मध्ये याच्या विरोधात सरपंच, ग्रामपंचायत मानिवली व ग्रामस्थांनी वरीष्ठ कार्यालयाकडे तक्रारी केल्याने व ग्रामसभेत तसा निर्णय झाल्याने भंडारी यांचा परवाना काही काळासाठी निंलबिंत करण्यात आला होता,परतू राजकीय वजन वापरुन पुन्हा शिधावाटप सुरु झाले असा आरोप ग्रामस्थानी केला आहे. परंतु याच्यात काही सुधारणा होता होईना.
कोरोनाच्या काळात संपूर्ण जग यातून कसा जिव वाचवायचा याच्या प्रयत्नात असताना हा दुकानदार मात्र गहू तांदूळ कमी देणे, पावत्या न देणे, डाळीचे पाँकिट न देता खुली डाळ देणे, आदीवाशी व इतर अंत्योदय यांना साखर व मोफत धान्य न देणे, महिलांना व जेष्ठ नागरिकांना उध्दट बोलने आदी प्रकार करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे, हे कमी की काय म्हणून धान्यात दगड, कच सापडल्याचा आरोप गावातील काशीनाथ भाऊ गायकर यांनी केला आहे, तर आंबो गायकर यांचे रेशनकार्ड फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला असे राष्ट्रवादी क्राँग्रेस सेवादल कल्याण अध्यश अशोक गायकर यांनी सांगितले, तसेच महिंलाशी प्रत्येक वेळी हुज्जत घालून उध्दट बोलणा-या या चिंतायण भंडारी यांचा परवाना रद्द करावा अशी आग्रही मागणी माझी सरपंच युंगधरा अशोक गायकर यांनी केली आहे. याबाबत कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांना विचारले असता ते म्हणाले, या दुकानदारा विरोधात धान्य घोटाळा केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या अनुशंगाने अहवाल बनविण्याचे काम सुरु आहे. तो होताच पुढील कारवाई साठी उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्याकडे पाठविण्यात येईल, तर जो पर्यत याचा परवाना रद्द होत नाही, तोपर्यत आम्ही लढत राहणार असे मानिवली ग्रामस्थांनी सांगितले.

No comments:
Post a Comment