मुरबाड तालुक्यातील शाळा सुरू करण्यासाठी पंचायत समिती मुरबाड प्रयत्नशील !
मुरबाड (मंगल डोंगरे) :
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे मुरबाड तालुक्यातील सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व हेळसांड पाहता व आता तालुक्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होत चाललेला आहे. कमी होणारा प्रसार पाहता आ. श्री. किसनजी कथोरे साहेब (आमदार, मुरबाड विधानसभा) यांच्या मार्गदर्शनाने व मा.श्री.श्रीकांतजी धुमाळ (सभापती, पं.स.मुरबाड) यांचे अथक प्रयत्नाने मुरबाड तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात याबाबत पंचायत समितीने दि.१४/१०/२०२० रोजी घेतलेल्या ठरावानुसार निर्गमित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे शाळा स्तरावर मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामसेवक यांनी शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेऊन निर्णय घ्यावा.
खरोखरच ठाणे जिल्ह्यातील पहिलीच मुरबाड पंचायत समिती अशी असेल की, आपल्या स्तरावरून तालुक्यातील शाळा सुरू करण्याबाबत प्रयत्नशील आहे.
सदर निर्णयांमुळे व प्रयत्नांमुळे "सन्मा.आमदार.श्री. किसनजी कथोरे" व "मा.सभापती श्री.श्रीकांतजी धुमाळ" यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment