Thursday, 22 October 2020

जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे विकास कामे प्रलंबित ?

जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे विकास कामे प्रलंबित ? 


मुरबाड  {मंगल डोंगरे} : ठाणे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे शाळेच्या वर्गांच्या खोल्यांचे टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा खोल्या गेल्या दोन महिन्यांपासून या कामाचं भिजत धोंगड पडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील साखरे धारगावातील जि.प. शाळेत एकाच खोलीत दोन वर्ग भरविण्यात येत असल्याने ग्रामपंचायत व पालकवर्गानी पाठपुरावा करून विद्यार्थ्यांची कुचंबणा होऊ नये म्हणून चार खोल्या ३८ लाखाच्या निधीसह मंजुर करुन घेतल्या व त्या प्रमाणे खोल्यांच्या बांधकामांचे टेंडर दि.५ ऑगस्ट रोजी ओपन झाले व दि.२० ऑगस्ट रोजी क्लोज करण्यात आले. खेदजनक बाब म्हणजे टेंडर ओपन करण्याची तारीख २४ ऑगस्ट असताना गेले दोन महिने झाले टेंडर ओपन होतच नाही. भरलेले टेंडर ओपन राहील्याने काही ठेकेदारांनी ७% कमी दराने टेंडर भरल्याने त्याच संस्थेला संबंधित काम मिळणार व भाजपा कार्यकर्त्यांच्या हातुन हे काम जाणार म्हणून जिल्हापरिषदेचे कार्यकारी अधिकारी नितीन पालवे हे दोन महिन्यांपासून संबंधित कामांचे टेंडर ओपन करीत नसल्याची लेखी तक्रार प.स सदस्य विष्णू घुडे यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांच्या कडे केली आहे. पालवे सारखे पक्षपाती करणारे शासकीय अधिकारी असल्यानेच  ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता असुनही विकास कामांना मंजुरी मिळुन सुद्धा प्रलंबित आहेत.                               
या बाबत नितीन पालवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अशा अनेक विकास कामावर C.O. मॅडम कामांच्या फाईलींवर सही करीत नसल्याने दिरंगाई होत आहे. (पालवे 9822791467)

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...