हातोंड ची शौर्य कन्या स्नेहल वाघमारे हिचा मुंबईचे 'पोलिस कमिशनर मा. परमवीर सिंह' यांच्या हस्ते सत्कार
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : नरौत्तम शेखसरीया फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पोलिस पाल्यांच्या ऊच्य शिक्षित आणि त्यांचे स्पोर्ट, सांस्कृतिक, सामाजिक योगदान ... शिक्षण घेत असतांना त्याही पेक्षा विशेष गुणात्मक दर्जा या संदर्भात मुलाखती घेण्यात आल्या होत्या, पैकी पाच मुलांची अंतिम निवड करण्यात आली.
यामध्ये, द्या एक मदतीचा हात यानुसार अनेक गोर गरीब मुलांना शैक्षणिक साथ देणारे, मुंबई पोलिस दलातील बिनतारी संदेश विभागातील मा. राजेंद्र वाघमारे (पोलिस हवालदार) यांची जेष्ठ कन्या कुमारी :- स्नेहल राजेंद्र वाघमारे खोपोली रायगड (धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या एका प्रवाशांचे प्राण वाचवीनारी शौर्य कन्या ) तसेच नवोदय विद्यालयाची गोल्डन गर्ल, मी सावित्रीबाई फुले बोलतेय एक पात्री नाट्यअभिनेत्री हिला मुंबई चे पोलिस कमिशनर मा. परमवीर सिंह साहेब यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारातून तसेच हितचिंतकां कडून स्नेहल राजेंद्र वाघमारे आणि त्यांच्या पालकांवर समाजातील सर्व स्तरातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment