हाथरस अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि त्यांना मदत करणार्यांवर कारवाई न केल्यास वंचित च्या सागर भालेराव यांचा आंदोलनाचा इशारा....
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : हाथरस उत्तर प्रदेश येथील १९ वर्षीय तरुणीवर उच्चवर्णिय तरुणांनी केलेल्या अमानुष अत्याचार व पाशवी बलात्कारा मुळे तिचा दु:खद मृत्यू झाला. की तिची हत्या करण्यात आली ? या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे.
ह्या अतिशय गंभीर घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी पीडीतेला मदत करण्यास टाळाटाळ केली. व आरोपींना आश्रय देण्याचं काम केलं. तसेच लोकांना विषय संमजे पर्यंत पीडितेचा FIR ही नोंदवून घेतला नव्हता. पिडितेच्या कुटुंबाला विश्वासात न घेता मध्यरात्री अंधारात तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचे काम केले. उत्तर प्रदेशच्या भाजप शासित योगी सरकारच्या कायदा गुंडाळून ठेवण्याची व गुंडाना पाठीशी घालण्याच्या भूमिकेमुळेच महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या देशात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडतो. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात व संपूर्ण देशात वारंवार पुढे येणार्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता धोक्यात आहे.
उत्तर प्रदेश मधिल पिडितेला न्याय मिळावा या मागणी साठी व उत्तर प्रदेश सरकार च्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा निषेध नोंदवत आहे. आणि सदर आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणात आरोपींना मदत करणारे असंवेदनशील शासकीय अधिकारी (जिल्हाधिकारी,पोलिस अधिकारी,वैदयकिय अधिकारी) यांच्या वर सुद्धा कडक कारवाही झाली पाहिजे. जनतेच्या सेवकांनी जनतेची सेवा केली पाहिजे याची जाणीव या मुळे सर्वाना होईल. आणि असे न झाल्यास दोषींना कठोर शिक्षा न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा सज्जड इशारा दिला.

No comments:
Post a Comment