Wednesday, 7 October 2020

पुण्यातील २२ वर्षीय नृत्यांगनेची नैराश्यातून आत्महत्या !

पुण्यातील २२ वर्षीय नृत्यांगनेची नैराश्यातून आत्महत्या !


पुणे - २२ वर्षीय नृत्यांगणा विशाखा काळे हिने नैराश्यातून हडपसरच्या गोंधळेनगर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा ही नृत्यगंणा होती. काही महिन्यांपूर्वी तिचा अपघात झाला होता. यात तिच्या चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या. यामुळे देखील ती घरी असे. तिला शो करता येत नव्हते. तर तिचे चित्रपट सृष्टीत काम करण्याचे स्वप्न होते, मात्र अपघात झाला आणि घरी बसावे लागले. त्यातच लॉकडाऊन झाले. त्यामुळे सर्व ठप्प झालं.

नामवंत निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्र गौरवगाथा व अरुण गायकवाड यांच्या गर्जा हा महाराष्ट्र या कार्यक्रमांमध्ये विशाखा काम करायची.

विशाखाचे वडील अंध असून आई एका खासगी शाळेत सेविकेचे काम करते. घऱाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यात लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नसल्याने विशाखाला नैराश्य आले होते, असे समजते.

आधीच अपघातामुळे घरी राहून गेले आणि आता लॉकडाऊनमुळे त्यांचे कार्यक्रम कमी झाले. काही दिवसांनी कार्यक्रम होणे पूर्णपणे बंद झाले आणि नवीन कार्यक्रम मिळत नव्हते. यामुळे ती नैराश्यात होती.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...