रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावठाणातील गावाची हद्दीमध्ये घर बांधण्यासाठी परवानगी देण्याबाबत आढावा बैठक !!
मुंबई दि. ६ : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावठाणातील हद्दीमध्ये घर बांधण्यासाठी असलेल्या निकषांबाबत आढावा बैठक मंत्रालय येथे झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर, कोकण विभागाचे उपायुक्त मनोज रानडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सिंधुदुर्गचे मंगेश जोशी यावेळी उपस्थित होते.
महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, गावठाणातील दोन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाची लोकसंख्या वाढवून ३ हजार करण्यात यावी. या गावातील १५० चौ किमी क्षेत्रापर्यंतच्या भूखंडावरील रहिवास वापराच्या बांधकाम परवानगीसाठी वास्तूविशारद किंवा अभियंता यांची आवश्यकता नसेल. तसेच बांधकाम परवानगी देण्यापूर्वी लागू असलेल्या सर्व नियमांची खातरजमा नियोजन प्राधिकरणाने करणे आवश्यक राहील. नगरविकास विभागाने प्रचलित विकास नियंत्रण नियमावली विचारात घेऊन बांधकाम परवानगी देणे बंधनकारक असेल. गावठाणातील काही अधिकार ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आले आहेत, असेही श्री सत्तार यांनी यावेळी सांगितले.
नगरविकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेत नगरविकास विभागाने टाऊन प्लॅननुसार नियोजन करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment