प्रतिपंढरपुर धानिवली येथे आगरी समाजातील विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : मार्च 2020 मध्ये झालेल्या ईयत्ता 10 वी 12 वी च्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणा-या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज प्रतिपंढरपुर धानिवली व शाई येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन अखिल आगरी समाज मुरबाड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी समाज मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कमळनाथ महाराज, शिवसेना मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे, दहिगावचे सरपंच प्रमोद शिंगोळे,शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन राणे, पो.पा.सिताराम राणे, युवा कामगार नेते दिलीप कराळे,देवगावचे माजी उपसरपंच मार्तंड टेकडे, हरेश तुपे, पत्रकार मंगलजी डोंगरे,आदर्श शिक्षक संतोष डोंगरे, इंजिनिअर अनिल माळी, सोमनाथ टेकडे, रमेश राणे,यांसह समाजातील जेष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आणि मनोगत व्यक्त करताना उपस्थित मान्यवरांनी अनेक प्रकारचे दाखले दिले. त्यात प्रत्येकाच्या आयुष्यात पुरस्कार आणि सन्मान हे माणसाला प्रेरणा देतात. तेव्हा पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेवून आपल्या समाजाचे व स्वतःचे नाव लौकिक करावे.तरच आजचे पुरस्कार फळप्राप्त झाल्याचे समाधान समाजातील संयोजक मंडळी ला मिळेल. याची दक्षता गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. असा ही सल्ला दिला.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात व धुमधडाक्यात होणारे गुणगौरव सोहळे यंदा कोरोनाच्या संकटामुळे छोट्या -छोट्या प्रमाणात आणि सामाजिक अंतर ठेवून आता पर्यंत सात सत्रांत घेण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास इयत्ता 10 वी आणि 12 वी तील मेरीट मध्ये उत्तीर्ण झालेल्या 650 विद्यार्थ्यांचा स्म्रुती चिन्ह व प्रशस्ती पत्रक देवून सन्मान करण्यात आला आहे. केवळ शेतीवर उपजिवीका करणारा आगरी समाज प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. भविष्यात आजच्या सन्मान मुर्तीनी वेगवेगळ्या क्षेत्रात गगण भरारी घेवून स्वता बरोबर समाजाचे नाव लौकिक करावे. अशी भावना उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना केली.आजच्या या कार्यक्रमाचे सुत्र संचलन आदर्श शिक्षक दिलीपजी खाटेघरे सर यांनी केले.


No comments:
Post a Comment