कल्याण तालुक्यातील नुकसान ग्रस्त भातशेतीचे पंचनामे होणार!
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील भात शेतीचे वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचे पंचनामे होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. अखेरीस कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी तालुका कृषी अधिकारी श्रीमती निखाडे मॅडम यांना पंचनाम्याचे आदेश दिले असून लवकरच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहे.
कल्याण तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना असताना ही शेतकऱ्यांनी भात लावणी उरकून घेतली. कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने भात बियाणे उपलब्ध करून दिले, कृषी सेवा केंद्रात खते मिळाली. त्यामुळे यावर्षी भात पिक चांगले आले होते पण दरवर्षी प्रमाणे याही वेळी अवकाळी व परतीच्या पावसामुळे आपटी, मांजर्ली, दहागाव, बापसई, फळेगाव, चौरे काकडपाडा, उशीद, गेरसे निंबवली, राया खडवली या भागातील भात पीक पडले.
शहापूर तालुक्यातील मड, आंबार्जे, शेरे, चिखलोली, शिरगाव, धानिवली तर मुरबाड मध्ये देखील अनेक ठिकाणी भात पीक पडले आहे. कृषी तज्ञांच्या मते नूसतेच भात पिक पडले तर काही अडचण नाही. परंतु ते पाण्यात भिजले तर मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. मागील वर्षी म्हणजे २०१९ रोजी १६२६. ०३हेक्टर क्षैत्राचे नुकसान झाले होते तर ७२७० शेतकरी बाधीत झाले होते. यावेळी देखील नुकसान झाले आहे. परंतू त्याचे प्रमाण कमी आहे. यावेळी पंचनाम्याचे शासनाने आदेश दिले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. अश्या प्रकारे एक पोस्ट व्हायरल केली जात आहे. यावर विचारना केली असता तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले की मी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत तर कृषी अधिकारी श्रीमती निखाडे मॅडम यांना विचारले होते त्या म्हणाल्या शेतकऱ्यांवर संकट आले आहे. कोरोनाचे संकट आहे. तरीही ज्या ज्या गावांमध्ये भातपिक पाण्यात भिजून नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्यात येईल.

No comments:
Post a Comment