Thursday, 8 October 2020

कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांची मदार आता भिवंडी तालुक्यातील सावद येथील कोरोना कोव्हीड रुग्णालयावर?

कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांची मदार आता भिवंडी तालुक्यातील सावद येथील कोरोना कोव्हीड रुग्णालयावर?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार वाटणारे वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर सुरू होण्याची शक्यता धुसर झाली असून आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण लोकांसाठी भिवंडी तालुक्यातील सावद येथील कोरोना कोव्हीड रुग्णालयावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच या सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले आहे त्यामुळे या नागरिकांची मदार सावाद येथील कोरोना कोव्हीड रुग्णालयावर अंवलबून असणार आहे. तर या बरोबरच वरप येथील कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संकटापासून ग्रामीण भाग दूर राहिला होता. पण गणपतीच्या दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. सध्याच्या काळात तालुक्यात १९५३ अॅक्टिव रुग्ण आहेत. मृत्यू पावलेल्या ची संख्या ९५, बरे झाल्याचे १६८५ तर प्रतिबंधित क्षेत्र ४१ इतके आहेत. एकूणच आकडेवारीवरून कोरोना कोव्हीड च्या रुग्ण संख्येत घट होत आहे असे दिसून येते. ही समाधानाची बाब असली तरी आता काही दिवसावर नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी एकापाठोपाठ एक सण येत आहे. या काळात लोकांची गर्दी होणार व यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा वेळी आपल्या परिसरात सुसज्ज रुग्णालय हवे. याच दृष्टीकोनातून वरप येथे कोरोना कोव्हीड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आज होईल, उद्या होईल असे तब्बल ४/५ महिने गेले मात्र अद्यापही या ना त्या कारणाने हे रुग्णालय सुरू काय होईना.
अखेरीस भिवंडी तालुक्यातील सावद येथे ८५० बेडचे सुसज्ज कोरोना कोव्हीड रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली ने वेग घेतला. सर्व टेस्ट, आॅक्शिजन, व्हॅन्टेलेटर, आयसीयू अशा विविध सोईसुविधा येथे निर्माण करण्यात आल्या असून एक दोन दिवसात सुरू होणार आहे असे वाटत असतानाच आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली. आणि परत हे उद्घाटन लांबणीवर पडले. त्यामुळे सर्वाना येथेच उपचार मिळतील असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच एजन्सी ला टेंडर देखील दिले असून येत्या काही दिवसांत सावज येथील कोरोना कोव्हीड सेंटर सुरू होईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार यांनी सांगितले. तसेच याच वेळी वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर सुरू करु असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांना भिवंडी तालुक्यातील सावद येथील कोरोना कोव्हीड रुग्णालयावर अंवलबून रहावे लागणार असे वाटते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...