समाजातील सर्व घटकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा !!
**सभापती श्रीकांतजी धुमाळ यांचे आवाहन **
मुरबाड (मंगल डोंगरे) : मागासवर्गीय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी डोंगर-द-यात राहणारे लाभार्थी शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेतात. मात्र मुरबाड शहराच्या शेजारी राहणा-या बहुतेक घटकांना त्यामध्ये मुरबाड शहरा शेजारचा एकही लाभार्थी दिसला नाही. जवळ राहणा-या लोकांना साधे पंचायत समितीचे कार्यालय माहिती नाही. योजना तर दुरवरच राहिल्या. म्हणून समजातील सर्व घटकांनी शासकिय योजनां समजून घेवून त्याचे लाभ घ्यावेत. असे आवाहन पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यात केले. ते ग्रुप ग्रमपंचायत धानिवली येथील "माझे कुटुंब माझी जबाबदारी"या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती मुरबाड व धानिवली ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जगभर कोरोना विषाणूने धुमाकूल घातला असताना आपल्या देशासह राज्यात त्याचे गंभिर परिणाम सर्व सामान्य माणसाला भोगावे लागत आहेत. या महामारी संकटात अनेकांना जिव ही गमवावा लागला आहे.अनेक कुटुंबे पोरकी झाली. व्हाटसपवर फक्त रोज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्या पलिकडे बाकी काही दिसत नव्हतं.या प्रसंगात आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवून प्रत्येकाने कोरोनाशी सामना केला पाहिजे. त्या अनुषंगाने आज नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क व सॕनिटायझर यांचे वाटप करण्यात आले. या वेळी नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्या बरोबरच शासनाच्या ब-याचशा योजना या नागरिकांना माहित नसल्याने, नागरिक त्यापासून वंचित राहतात म्हणुन शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे जावून घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुरबाडचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, समाजसेवक मोहन भावार्थे, धानिवली गृपग्रामपंचायतच्या सरपंच सिता भोईर, उपसरपंच श्याम भोईर, जयवंत कराळे, नितीन राणे, ग्रामसेविका शेलवले मॕडम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment