कल्याण (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, कल्याण शाखेने तालुक्यातील शेतक-याच्या माहे आक्टोंबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करण्यास नकार दिला होता, यानंतर ग्रामसेवकावर सर्वच स्तरातून चौफेर टिका झाली होती, यामुळे पुन्हा संघटनेने आम्ही संयुक्तिक पंचनामे करण्यास तयार आहे, तसे नवीन आदेश काढावेत असे पत्र तहसिलदांरांना दिले. त्यामुळे तहसिलदांरानी नवीन सुधारित आदेश काढले, पण या नवीन आदेशानुसार ग्रामसेवकांनी काम न केल्यास किंवा या बाबत संबधित शेतक-याने तक्रार केल्यास ग्रामसेवकावर आपती व्यवस्थापन कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा तहसिलदार दिपक आकडे यांनी दिला आहे, त्यामुळे आता पंचनाम्याचा बाँम्बगोळा कोणावर पडतो, हे लवकरच कळणार आहे.
माहे आँक्टोबर २०२०मध्ये अवकाळी पावसामुळे कल्याण तालुक्यातील शेतक-याचे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे,त्यामुळे या नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-याकडून होत आहे, तसे शासनाने आदेश दिले होते. कल्याण तहसिलदार दिपक आकडे यानी पंचनामे लवकर व बिनचूक व्हावेत म्हणून तलाठी, कृषीसहाय्यक व ग्रामसेवकावर वेगवेगळ्या गावांची जबाबदारी सोपविली होती.यामध्ये ग्रामसेवक ३०/३२ गावे, तलाठी१०/१५ गावे आणि कृषीसेवक १५/२० गावांचा समावेश होता. मात्र ग्रामसेवकांनी कोरोनाच्या काळात खूप काम केले पण त्याचे कोणी कौतुक केले नाही, यासह इतर मुद्दांचा समावेश करुन ग्रामसेवकावर मोठा अन्याय झाल्याचा साक्षात्कार संघटनेला झाला व कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटामुळे जीव टांगणीला लागलेला असताना, लाँकडाऊन व अवकाळी पावसाने वर्षभराचे अन्नधान्य हिराऊन घेतल्याने पुरता बेजार झालेल्या बळीराजाचे नुकसानिचे पंचनामे करणार नसल्याचे पत्रच ग्रामसेवक संघटनेने तहसिलदांराना दिल्याने वरिष्ठ अधिका-यानी तीव्र नाराजी व्यक्त केली तर पत्रकार संजय कांबळे यांनी शेतक-याची बाजू घेऊन विविध वृत्तपत्रातून चौफेर टिका केली,तसेच समाजातील विविध घटकांनी व शेतक-यांनी या विरोधात अंत्यत तिकट प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे अखेर ग्रामसेवक संघटनेने नमते घेत आम्ही पंचनामे करण्यास तयार आहोत पण तलाठी, ग्रामसेवक व कृषीसेवक असे संयुक्त आदेश काढावेत अशी मागणी केली त्यामुळे बिकट परिस्थितीचा विचार करुन तहसिलदारांनी नवीन सुधारित संयुक्त आदेश कढले यामध्ये तालुक्यातील ७० गावासाठी ग्रामसेवक, तलाठी व कृषीसेवक यांची नियुक्ती केली असून तसे आदेश काढले आहे, शेतक-याचे पंचनामे करुन त्याचे बँक तपशील, आधारकार्ड, ७/१२ वर सामाईक क्षेत्र असल्यास त्यांचे संम्मतीपत्र फार्म भरुन ग्रामसेवक, तलाठी व कृषीसेवक यांनी स्वाक्षरीसह वरिष्ठांच्या सहीसह कार्यालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतक-याना वेळेत मदत मिळेल अशी आशा व्यक्त करुया, या संदर्भात कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांना विचारले असता ते म्हणाले "ग्रामसेवकांनी अंदोलन करण्याची वेळ चुकीची निवडली, हे मोठे संकट आहे, शेतकरी उध्वस्त होत आहे अशा वेळी त्यांना आधार द्यायला हवा पण शुल्लक कारणावरुन त्यांनी पंचनामे करण्यास नकार दिला होता. आता त्यांच्या विनंती वरून सुधारित आँर्डर काढल्या आहेत. आता त्यांनी काम केले नाही किंवा नुकसानग्रस्त शेतक-याने तक्रार केली तर मात्र यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वे कडक कारवाई करणार".
त्यामुळे कामचुकार कर्मचा-यावर ऐन दिवाळी दस-यामध्ये पंचनाम्याचा तोफगोळा पडणार ऐवढे नक्की!
No comments:
Post a Comment