Friday, 9 October 2020

रस्ता खुला करण्यासाठी गटविकास अधिकारी स्मशानभूमीत *रस्ता द्या अन्यथा अंत्यसंस्कार तहसीलदार कार्यालयाचे प्रांगणात* संतप्त ग्रामस्थांचा इशारा.

रस्ता खुला करण्यासाठी गटविकास अधिकारी स्मशानभूमीत *रस्ता द्या अन्यथा अंत्यसंस्कार तहसीलदार कार्यालयाचे प्रांगणात* संतप्त ग्रामस्थांचा इशारा.


मुरबाड :- कल्याण माळशेज महामार्गावर असलेल्या वांजळे गावाचे स्मशानभूमीचा रस्ता एका अवैध ढाबे चालकाने अडविल्याने स्थानिक पोलीस पाटील रवींद्र भोईर. भिमराव भोईर,संतोष बाईत,प्रविण भोईर.  सरपंच ,माया लाटे. हेमंत लाटे यांच्या सह शेकडो  ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ,हा रस्ता खुला करा.अन्यथा होणारे अंत्यसंस्कार हे तहसीलदार कार्यालयाचे प्रांगणात करण्याचा इशारा दिल्याने  तहसीलदार कार्यालयाचे प्रतिनिधी व स्वतः गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी स्मशानभूमीत भेट देऊन परिस्थिती ची पहाणी केली.व सदरचा रस्ता आठवडाभरात खुला करण्याचे अश्वासन दिले.
             वांजळे गावचे पांरपारिक स्मशानभुमी हि कल्याण मुरबाड माळशेज महामार्गा लगत असल्याने  रोड लगत असणाऱ्या खाजगी जागेवर  एक ढाबा तयार करण्यात आला. मात्र सदर च्या स्मशानभूमीत ढाब्यासमोरुन प्रेते जात असल्याने या ढाबा मालकाने स्मशानभुमी कडे जाणारा मुख्य रस्ता बंद करुन सभोवताली कंपाउंड तयार केला.त्यामुळे चालु वर्षी पंचायत समीतीने जनसुविधा योजने अंतर्गत या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी विशेष तरतूद करुन तो निधी स्मशानभुमी परिसरात खर्च केला मात्र स्मशानभुमी कडे जाणारा मुख्य रस्ता बंद असल्याने स्मशानभूमीत प्रेते न्यायची कशी हा प्रश्न ग्रामस्थासमोर राहिल्याने  सदरचा रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार ,गटविकास अधिकारी ,व बांधकाम विभाग पंचायत समिती मुरबाड यांना वेळोवेळी लेखी निवेदने देऊन या गंभीर बाबीचा विचार होत नसल्याने .संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीत ठिय्या आंदोलन करत हा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा भविष्यात होणारे अत्यसंस्कार हे तहसीलदार कार्यालयाचे प्रांगणात करण्याचा इशारा दिल्याने  गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी स्मशानभुमी ची प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली असता सदरचे ढाबे चालकाने स्मशानभुमी ला अतिक्रमणाचा घातलेला विळखा पाहून ग्रामसेवक व सरपंच यांना ढाबे चालकाला अतिक्रमण काढुन टाकण्याची नोटीस देऊन अतिक्रमण हटवुन रस्ता खुला करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने ग्रामस्थामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

         **सदर स्मशानभुमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे ग्रामपंचायतीने वेळीच खडीकरण किंवा काँक्रीटीकरण केले असते ,तर तो रस्ता ढाबे मालकाने ताब्यात घेतला नसता--भिमराव भोईर.

           **सदर रस्ता खुला झाल्यास ग्रामपंचायत कडे असणाऱ्या निधीतून त्याचे काँक्रीटीकरण केले जाईल--माया हेमंत लाटे.सरपंच .ग्रामपंचायत वांजळे.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...