रोड रोलर चालक संघटनेच्या वतीने भिसोळवाडी येथील आदिवासीची दिवाळी गोड !!
कल्याण (संजय कांबळे) : गोरगरिब, कष्टकरी कामगार अण्यासग्रस्त,पिडित लोकांसाठी काम करणाऱ्या रोड रोलर चालक संघटनेच्या वतीने भिसोळवाडी येथील आदिवासीना साडी आणि मिटाई चे वाटप करुन त्यांची दिवाळी गोड करणा-या या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रक्षीद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांच पपरिसरातून कौतुक होत आहे.
गेल्या पाच ते सहा महिन्यापासून देशात लाॅकडाऊण लागू करण्यात आले यामुळे सर्वानाच त्रास होतो आहे गर्भ श्रीमंत व मध्यम वर्गीय कसेबसे यातून बाहेर पडले आहेत. परंतु गोरगरिबांना व कष्टकरी व पिडितांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला शासनाच्या मेहेरबानीने कसेतरी रेशनिंग मिळाल्याने उपासमार थांबली. पण हाताला काम नाही पैसा नाही यामुळे यंदा दिवाळी कशी साजरी करायची याची चिंता गोरगरिबांना व आदीवाशी ना वाटत होती. काहींनी तर साजरी केली नाही. त्यामुळे हे ओळखून तालुक्यातील रोड रोलर चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रशीद शेख यांनी संघटनेच्या वतीने मदत गोळा करून भिसोळ पाडा येथील आदिवासी वाडितील महिलांना जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती जयश्री सासे यांच्या हस्ते महिला ना साडी व मिटाई वाटत करण्यात आले
या छोटेखानी कार्यक्रमाला भिसोळ ग्रामपंचायतीचे सरपंच सरिता भोपळे, जेष्ठ शिवसैनिक रामदास लोणे, समाजसेवक तानाजी पालवे, सचिव प्रमोद सुबोध, सोमनाथ मनोज, शबीर बशीर, संदिप चोरगे, पत्रकार संजय कांबळे, आदी ग्रामस्थ व आदिवासी महिला उपस्थित होत्या.
यावेळी आपण गोरगरिबांना व कर्मचारी तसेच पिडित कष्टकरी यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष रशीद शेख यांनी केले. तर जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती जयश्री सासे यांनी या संघटनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे भाषणात सांगितले. ऐन गरजेच्या वेळी रोड रोलर चालक संघटनेच्या माध्यमातून आदीवाशींना मिटाई व साडी वाटप करण्यात आल्याने आदीवाशी ची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. संघटनेच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
No comments:
Post a Comment