जेष्ठ अभिनेते कै . डॉ. श्रीराम लागू परिवाराची मराठी नाटक समूहाला अविस्मरणीय दिवाळी भेट !
कल्याण (संजय कांबळे) : मराठी नाट्य व्यवसाय मार्च 2020 पासून बंद पडलेला आहे आणि ह्याचा सर्वात जास्त फटका बसलेला घटक म्हणजे पडद्यामागील कलाकार.. ह्याच घटकासाठी मे 2020 पासून मराठी नाटक समूह ह्या व्हाट्सअप्प समूहाने एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा हा उपक्रम सुरू केलेला आहे हे ओळखून जेष्ठ अभिनेते कै डॉ श्रीराम लागू यांच्या रुपवेध प्रतिष्ठान ने या समूहाला तब्बल ५लाख रायते इतकी मदत देऊ केल्याने सर्व कलाकारांची दिवाळी गोड झाली आहे. ... मे 2020 पासून ह्या पडद्यामागील कलाकारांना समूह आर्थिक सहकार्य देत आहे
आजपर्यंत अनेक देश विदेशातील रसिकांनी, कलावंतांनी ह्यात प्रामुख्याने सौ. अश्विनी भावे, बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका, नाम फाऊंडेशन ह्या सारख्या अजून अनेक संस्थांनी मराठी नाटक समूहाच्या ह्या उपक्रमाला हातभार लावलेला आहे. नुकताच मराठी नाटक समूह हा आणखी एका प्रतिष्ठानाच्या विश्वासाला पात्र ठरलेला आहे, ते प्रतिष्ठान म्हणजे कै. डॉ. श्रीराम लागू ह्यांचे रुपवेध प्रतिष्ठान.ए होय.
रुपवेध प्रतिष्ठान च्या माध्यमातून प्रतिवर्षी तन्वीर सन्मान आणि युवा रंगकर्मी साठी तन्वीर रंगधर्मी पुरस्कार प्रदान केला जातो. ह्यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सदर पुरस्कार वितरण सोहळा स्थगित करण्यात आला. कै. डॉ. श्रीराम लागू ह्यांना पडद्यामागील कलाकारांप्रती असलेला जिव्हाळा, ते त्यांच्यासाठी करत असलेले सहकार्य सर्वांना ज्ञात आहे, आपल्या प्रयोगाचे मानधन देखील ते पडद्यामागील कलावंतांसाठी देत असत. ह्या कोरोना संकटाच्या काळात कै. डॉ. लागू ह्यांच्या कुटुंबीयांनी ह्याच पडद्यामागील घटकाला आपुलकीचा हात देणाऱ्या मराठी नाटक समूहाच्या उपक्रमाची निवड केली ही मराठी नाटक समूहासाठी अत्यंत अभिमानाची घटना आहे.असे समूहाचे म्हणने आहे. पुरस्काराची रक्कम आणि ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी येणारा खर्च अशी एकत्रित रक्कम गृहीत धरून लागू कुटुंबीयांनी रुपवेध प्रतिष्ठान मार्फत रुपये 5 लाखाची भरघोस आर्थिक मदत मराठी नाटक समूहाच्या "एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा" ह्या उपक्रमासाठी नुकतेच एका छोटेखानी व्हर्च्युअल कार्यक्रमात प्रदान केली.
सदर सोहळ्याचे सूत्र संचालन गौरी लागू ह्यांनी केले तर प्रास्ताविक अमेरिकेतून श्री. आनंद लागू ह्यांनी केले.. श्री. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दामले ह्यांनी मराठी नाटक समूह आणि पडद्यामागील कलावंत ह्यांचं मराठी नाटक व्यवसायात असलेलं महत्व आणि ह्या घटकाला आधार देण्याची आवश्यकता आपल्या मनोगतात व्यक्त केली.. रुपवेध प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री आणि कै. डॉ. श्रीराम लागू ह्यांच्या पत्नी श्रीमती दीपा लागू ह्यांनी मराठी नाटक समूहाचे श्री. आशीर्वाद मराठे आणि पडद्यामागील कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून श्री. अशोक सोनावळे ह्यांना सदर रक्कम प्रदान केली. डॉ. लागू ह्यांच्या पडद्यामागील कलावंतांविषयी असलेल्या जिव्हाळ्याबद्दल आणि तन्वीर पुरस्कार सोहळ्याबद्दल श्रीमती दीपा लागू ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. आशीर्वाद मराठे ह्यांनी मराठी नाटक समूहाच्या पडद्यामागील कलाकारांसाठी सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली आणि मराठी नाटक समूहाला रुपवेध प्रतिष्ठान ने ह्या दिवाळी भेटीसाठी पात्र समजल्याबद्दल समूहाच्या वतीने ऋण व्यक्त केले..
ह्या छोटेखानी व्हर्च्युअल कार्यक्रमात देश विदेशातून अनेक रसिक, कलावंत, रंगकर्मी उपस्थित होते.. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभांगी कानेटकर ह्यांनी केले..
मराठी नाटक समूहाने आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आणि केलेल्या पारदर्शक कार्याने विश्वास संपादन केलेला आहेच आणि त्यात असाच रसिकांचा, रंगकर्मींचा, विविध संस्थांचा मिळणारा हातभार ह्यामुळे अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि ह्या सर्वांच्या विश्वासाला मराठी नाटक समूह नक्कीच पात्र ठरेल असे प्रतिपादन आशीर्वाद मराठे ह्यांनी ह्याप्रसंगी केले.
No comments:
Post a Comment