कल्याण येथे महिलांसाठी रोजगार मिळावा महणून कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम !!
कल्याण, ऋषिकेश चौधरी : देवानंद भोईर हे कोळी समाजाचे नेते आहेत. ते वृक्ष प्राधिकरण समिती चालवितात. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण विभागासाठी ते काम करतात. नव्या संकल्पना राबवून त्यांचा चांगले उपक्रम घेण्यावर अधि भर आहे. राज्य सरकारने प्लास्टीक बंदी केली आहे. प्लास्टीक बंदीची मोहीम महापालिकेच्या वतीने प्रभावीपणो राबविली जात नाही. कोरोना काळात प्लास्टीक बंदीची मोहिम पूर्णपणो थंडावली आहे. उल्हासनगरातील सामाजिक कार्यकत्र्या ज्योती तायडे यांच्या उपक्रमाविषयी भोईर ऐकून होते. त्यांनी तायडे यांच्याशी संपर्क साधला. ज्योती तायडे या २०१८ सालापासून उल्हासनगरात कागदी पिशव्या तयार करण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या पर्यावरण स्नेही व प्लास्टीक विरोधी उपक्रमातून ५०० पेक्षा जास्त महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. तायडे यांचा उपक्रम कल्याणमध्येही सुरु करण्यासाठी भोईर यांच्या मनात विचार आला. ते केवळ विचार करुन थांबले नाही. तो विचार त्यांनी कृतीत आणला. भोईर यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यातून कल्याण परिसरातील महिलांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. प्लास्टीक निमरूलन व महिला सक्षमीकरण हा दुहेरी उद्देश यातून साध्य होणार आहे. प्रकल्पाचे भविष्यातील यश पाहता कापडी पिशव्या तयार करण्याचे ही काम केले जाणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.आज दिवाळी निमित महिलांना फराळ वाटप केला आणि सुभेच्या दिल्या.
No comments:
Post a Comment