उद्धट बिल्डरकडे घराची बुकींग केलेल्या रिक्षाचालकाला पैसै परत मिळवून देण्यास श्री महेश मोरे यांची मदत !
ठाणे, (प्रतिनिधी) : घराची बुकींग केल्यानंतर अचानक देशात आणि राज्यात कोरोना पसरल्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारिची पाळी आली होती. आर्थिक परिस्थिती कोलमडल्याने घराची पुढील रक्कम भरायची कशी? त्यापेक्षा घरच रद्द करुन बिल्डरला दिलेले पैसे पुन्हा घेवून घरातील अडचणी सोडवता येतील, या आशेने गेलेल्या रिक्षाचालकाला बिल्डरकडून नाहक त्रास आणि शिव्यां घ्याव्या लागल्या होत्या.दरम्यान प्रकरण भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडी कोकण सरचिटणीस श्री महेश मोरे यांच्या दणक्यानंतर या बिल्डरने घर बुकींग केलेली रक्कम परत केली आहे.त्यामुळे रिक्षाचालकाने आभार मानले आहेत.
ठाण्यातील रिक्षाचालक अशानंद पाठक यांनी काल्हेर येथील ओम भगवती बिल्डरकडे घरासाठी फेब्रुवारी 2020 रोजी बुकींग केली होती.यानंतर राज्यात कोरोनाचा शिरकाव आणि वारंवार लाॅकडाऊन होत राहील्याने रिक्षाचालकांवर उपासमारिची पाळी आली होती.त्यामुळे आता मुलांची शाळेची फी भरतानाही या रिक्षा चालकावर मोठे आर्थिक संकट आले.ज्या घरासाठी नातेवाईक मदत करणार होते तेही टाळेबंदीत बेरोजगार झाल्याने मदत करण्यास तयार नव्हते.अशावेळी भगवती बिल्डरकडे घरासाठी बुकींग केलेली रक्कम परत मिळवून उदरनिर्वाह चालविणे हा एकमेव मार्ग या रिक्षाचालकावर होता.
दरम्यान काल्हेर येथील ऒम भगवती बिल्डरकडे दिलेले 25 हजार रुपयांची रक्कम परत करण्याची मागणी केली असता या बिल्डरने रिक्षाचालकास सुरवातीला साफ नकार दिला.प्रसंगी शिव्याही दिल्या होत्या.त्यामुळे आपले पैसै वाया गेले अशा विवंचणेत असलेल्या अशानंद पाठक यांना ठाण्यातील भाजपचे नेते श्री महेश मोरे यांचा संपर्क मिळाला.महेश मोरे यांची भेट घेवून घडलेला प्रकार सविस्तर सांगण्यात आला.महेश मोरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सदर भगवती बिल्डरला संपर्क करुन रिक्षाचालकाचे पैसे तातडीने परत करण्यास सांगितले.मोरे यांचा दणका मिळताच बिल्डरने लगेच धनादेशाद्वारे पैसे परत केले आहेत.रिक्षाचालक अशानंद पाठक यांनी भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे कोकण विभाग सरचिटणीस श्री महेश मोरे यांचे आभार मानले आहेत
No comments:
Post a Comment