Saturday, 14 November 2020

राज्य सरकारची मुंबई लोकल संदर्भातील मागणी मान्य !!

राज्य सरकारची मुंबई लोकल संदर्भातील मागणी मान्य !!


मुंबई, प्रतिनिधी : मुंबई लोकलसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी विनंती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे. दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीसाठी शाळा उघडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात एक पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..... नालासोपारा, प्रतिनिधी ता, २३ :- शिवसेना मुख्य...