Monday, 16 November 2020

रितिका भोसले हिने पटकावले इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक !

रितिका भोसले हिने पटकावले इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक !


"आजवर इंटरनॅशनल स्पर्धेत पाच सुवर्ण पदकांची तर एका रजत पदकाची मानकरी रितिका भोसले"

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
             जागतिक दयाळूपणा दिवसानिमिताने घेण्यात आलेल्या  इंटरनेशनल विरंतुअल काता चँम्पियनशिप - २०२० कराटे स्पर्धेत रितिका भोसले हिने सुवर्ण पदक जिंकले तर रजत पदक इरान ला व कास्य पदक ब्राझिल आणि इटली ने जिंकले. कोरोना काळात सर्व नियम पाळून झालेल्या या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, ब्राझिल, निगेरिया, इरान, इटली, तुर्की, युऐई, भुतान, नेपाळ, बुरुंडी, इजिप्त, हाँलंड या देशांचा सहभाग होता.१३ देशातील एकूण ३८६  स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. इंटरनेशनल गोल्ड मँडल जिंकलेल्या रितिका भोसले ने या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याने आजवर तिच्या नावावर इंटरनॅशनल स्पर्धेत पाच गोल्ड मेडलची व एका रजत पदकाची नोंद झाली. भारतातील स्पर्धेत एकुण १५ पदके रितिका भोसलेनी जिंकली आहेत. त्यामुळे २१ पदकांची मानकरी रितिका भोसले ठरली आहे. फ्राज शेख सरांच्या मार्गदर्शनाखाली रितिकाने हे यश संपादन केले. याकामी तिचे आई-वडिल व घरचे सर्व सदस्य आवश्यक ते सहकार्यसह प्रोत्साहन देतात असे मत पदक पटकावल्यानंतर रितिकाने व्यक्त केले. रितिकाने पुन्हा एकदा सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल तीचे विक्रोळी पार्क साईट विभागातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था, मंडळ यांच्यासह पत्रकार दत्तेश्वर गायकवाड व अन्य मित्र परिवारांतर्फे तिला अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी ! मुंबई, (केतन भोज) : तळा तालुका ...