Wednesday, 9 December 2020

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच्या जन्मदिनानिम्मिताने ना. बाळासाहेब थोरातांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न !!

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच्या जन्मदिनानिम्मिताने ना. बाळासाहेब थोरातांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : बुधवार दिनांक ९ डिंसेबर २०२० रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जन्मदिना निम्मिताने ठाणे-पालघर जिल्हा स्तरीय ॲानलाईन किल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रॅायलस्टोन या शासकीय निवासस्थानी पर्यावरण काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा ब्लॅाकचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार, जिल्हाउपाध्यक्ष संजय शेलार, नरेश मोरे, धनाजी बांगर, यश शिंगडा, अनिल चिराटे आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. 


सदरील किल्ले प्रदर्शन स्पर्धेमध्ये मुरबाड तालुक्यातील मौजे शिरगाव येथील नंंदकुमार शिंदे - प्रतापगड यांना प्रथम क्रमांक, वाडा तालुक्यांतील कल्पेश गायकर/पियुष चौधरी- पद्म दुर्ग यांचा व्दितीय क्रमांक तर कल्याण शहरातील ओंकार चव्हाण- तोरणागड यांचा तृतीय क्रमांक आला .यावेळी त्यांना मानपत्र, रोख रक्कम व बलिदान पुस्तके भेट दिली. चेतनसिंह पवार व त्यांची टिम ही नाविन्यपुर्ण उपक्रमाच्या माध्यमातुन पक्षाची विचारधारा वाढीसाठी तसेच संघटना बांधणीसाठी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल ना.बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सर्वांचे कौतुक केले. सदरच्या स्पर्धेमध्ये शेकडों स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्याबद्दल स्पर्धकांचे आभार मानले आणि पुढील वर्षी भव्य स्वरुपाचे आयोजन करणार असल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!  ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध का...