मुरबाड मध्ये एच.आय. व्ही. एड्स जनजागृती अभियान संपन्न !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) :
दिनांक 08 नोव्हेंबर 2020 रोजी मुरबाड तालुक्यात नेहरू युवा केंद्र ठाणे, (युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार), जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व गर्जा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या सहाय्याने एच. आय. व्ही. एड्स जनजागृती अभियान मुरबाड शहरातील तोंडलीकर नगर येथे सुरू करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर त्यांच्याद्वारे एच.आय.व्ही एड्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर गर्जा प्रतिष्ठान मुरबाड या मंडळाच्या सदस्यांनी एडस या विषयावर पथनाट्याद्वारे जनजागृतीपर नाट्य सादर केले. नंतर याच ग्रुपने मुरबाड शहरातीलतील गोड्याचा पाडा, बाजारपेठ, ताड आळी, व मुरबाड बस स्टॅन्ड इत्यादी ठिकाणी पथनाट्य सादर करून एच .आय. व्ही एड्स बद्दल जनजागृती करण्याचा यशस्वी कार्यक्रम पार पाडला. आज समाजात एड्सबद्दल भयंकर शंका असल्यामुळे कोणीही तपासणी करून घेण्यासाठी पुढे येत नाही. गर्जा प्रतिष्ठान मुरबाड यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या पथनाट्यामुळे जास्तीत जास्त लोक एड्स ची चाचणी करून घेण्यासाठी तयार व्हावेत या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी जिल्हा ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथील एच आय व्ही एड्स समुपदेशक मा. अर्चना भालेराव यांनी एड्स चा प्रचार प्रसार कशा द्वारे होतो त्याला थांबवायचे उपाय व झाल्यास घ्यावयाची काळजी या सर्वावर खूप छान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. छायाताई चौधरी -नगराध्यक्षा मुरबाड नगर पंचायत '' लक्ष्मण घागस सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा तोंडली-आम्रपाली आहिरे (मुरबाड ग्रामीण रुग्णालय- लॅब टेक्निशियन), अर्चना भालेराव (मुरबाड ग्रामीण रुग्णालय- एच आय व्ही एड्स समुपदेशक), मा. मोहनजी सासे (माजी. नगराध्यक्ष), श्री सूर्यवंशी त्रंबक (मुरबाड डेपो मॅनेजर), मा.मंगलजी डोंगरे -जेष्ठ पत्रकार मुरबाड ' हर्षदा जाधव (राष्ट्रीय युवा स्वयंसेवक- नेहरू युवा केंद्र, ठाणे), गर्जा प्रतिष्ठान मुरबाडचे अध्यक्ष व पथनाट्याचे आयोजक व निर्माते नितेश डोंगरे व त्यांची २० जणांची टीम या कार्यक्रमात उपस्थित होते. मुरबाड तालुक्यातील १५० लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


No comments:
Post a Comment