Tuesday, 15 December 2020

एस के फिल्म् प्रोड्क्शन निर्मित 'मराठी साँग' च्या शुटिंगला प्रांरभ !

एस के फिल्म् प्रोड्क्शन निर्मित 'मराठी साँग' च्या शुटिंगला प्रांरभ !                                         


कल्याण (संजय कांबळे) : बहुचर्चित एस के फिल्म् प्रोड्क्शन ची निर्मिती असलेल्या विविध मराठी साँगचे शुटिंग चा प्रांरभ आज प्रसिध्द उदयोजक मोहन शेठ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व एस के फिल्म् चा क्लाप दाखवून झाला.
यावेळी प्रसिध्द उद्योगपती मोहन शेठ, कांबा गावचे उद्योगपती बनकरी, विल्सन तसेच टिम प्रमुख संजय कांबळे, शांताबाई फेम सिधू गायकवाड आणि कँमेरामन संतोष पवार, संदिप साळुंखे व टिम कलाकार उपस्थित होते, एस के फिल्म् प्रोड्क्शन ची निर्मिती असलेल्या सुपरहिट मराठी गाणी "शिंदेशाही" घराण्यातील सुप्रसिध्द गायक समर्थक शिंदे यांनी गायली असून याचे गितकार शिवाजी पवार हे असून सदर गाणी लाँकडाऊण लागू होण्या अगोदर रेकाँर्डिग करण्यात आली होती, परंतू कोरोनाच्या संकटामुळे याचे विडिओ शुंटिग झाले नव्हते, पण आता लाँकडाऊण शिथिल झाल्याने आज एस के फिल्म् चा निर्मिती असलेल्या मराठी साँग चे शुट सुरु झाले आहे, सदरचे शुंटिंग तीन दिवस चालणार असून निसर्ग सोंदर्याने नटलेल्या माळशेज घाट परिसरात सध्या शुंटिंग सुरु असून याचे उदघाटन  नुकतेच झाले ,याकरीता कल्याण तहसिलदार दिपक आकडे, कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस इन्पेंक्टर, बंजरंग रजपूत, प्रदिप अरोटे, डोंबिवलीचे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सुभाष म्हात्रे, मोहन शेट, दिलीप शेठ, निवृतीशेठ पाटील , आदींनी मोलाचे सहकार्य केले.                
यावेळी एस के फिल्म् चे कलाकार कु.साक्षी पाटेकर, दिव्या गायकवाड, वैष्णवी धायगुडे, गौरी पाटील, मोहसीन जमादार, रोहित सकटे, नामदेव बल्लाळ, सुरेश वाडकर, कु हिंमाशू कांबळे आणि शांताबाई फेम सिधू गायकवाड आदी कलाकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...