महानगरपालिकेच्या जुन्या मोडकळीस आलेल्या घाटकोपर, पार्क साईट विक्रोळी पश्चिम येथील इमारतींच्या पुनर्वसन सदनिकांचा वास्तविक बांधकाम - आकार ४०५ चौरस फूट निश्चित
मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
बृहन्मुंबई महानगरपालिका(एमसीजीएम) अधिकारी व २८ इमारतींमधील रहिवाशांची संयुक्त बैठक जैन मंदिर हॉल पार्कसाईट येथे घेऊन २८ इमारती मधील रहिवाशांच्या जुन्या सदनिकांच्या पुनर्विकासासंदर्भातील प्रगतीचा आढावा ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी घेतला. बैठकीत युनिट प्लॅन फायनलायझेशन, बिल्डिंग लोकेशन आणि मास्टर लेआउट फायनलायझेशन या महत्वपुर्ण विषयावर चर्चा केली. दुर्गेश पालकर डीवाय एमए, सुरेंद्र बोराळे महानगरपालिका आर्किटेक्ट आणि मा.नगरसेवक हारून खान शिवसेना नेते, धर्मेश गिरी भाजपा मुंबई ईशान्य जिल्हा उपाध्यक्ष आणि पार्कसाईट ओल्ड बिल्डिंग्स वेलफेअर असोसिएशनचे प्रतिनिधी या महत्वपुर्ण बैठकीस उपस्थित होते.

No comments:
Post a Comment