Wednesday, 9 December 2020

रोटरी क्लब चोपडा कडून "माणुसकीची ऊब"-आदिवासी वस्तीमध्ये केले कपडे वाटप !

रोटरी क्लब चोपडा कडून "माणुसकीची ऊब"-आदिवासी वस्तीमध्ये केले कपडे वाटप !


चोपडा, प्रतिनिधी -
राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरत असताना चोपडा येथील रोटरी क्लबने आज नागलवाडी या गावात तेथील गोर गरिबांना कपड्यांचे वाटप करून मायेचा झरा वाहता केला.


चोपडा रोटरीने 'माणुसकीची ऊब' या आपल्या प्रकल्प अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत नागलवाडी या आदिवासी गावात सर्व वयोगटातील जवळजवळ २०० गरीब व गरजू लहान-मोठ्या मुला-मुलींना व तसेच आदिवासी बांधवांसाठी आवश्यक कपड्यांचे वाटप करण्यात आले तेव्हा त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 


सदर कार्यक्रमासाठी चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, मानद सचिव रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ. अमोल पाटील, राधेश्याम पाटील, नितीन जैन, विलास पाटील, पंकज पाटील, चंद्रशेखर साखरे, अर्पित अग्रवाल तसेच गावातील सर्व आदिवासी बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!  ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध का...