श्री शिवाजी विद्यामंदिर, काळसे, माजी विद्यार्थी सेवा संस्था यांच्या संयुक्त पणे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न !
मालवण, प्रतिनिधी : श्री शिवाजी विद्यामंदिर, काळसे, तालुका - मालवण, जिल्हा - सिंधुदुर्ग या शाळेने अनेक विद्यार्थी घडविले यातील अनेक उच्चशिक्षित तर काही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत या माजी विद्यार्थ्यांनी ज्या शाळेने आपल्याला घडविले व यामुळे आपणास समाजात मानाचे स्थान मिळाले तर आपले सुध्दा शाळे प्रती योगदान आहे असे समजून त्यांनी माजी विद्यार्थी सेवा संस्था या माध्यमातून शाळेसाठी तसेच गरजवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात.
आता कोरोना सारखी महामारी यामुळे बरेच महिने बंद असलेल्या शाळा हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.
अकरा तारखे पासून काही वर्ग सुरू करण्याची तयारी शाळा करीत असताना माजी विद्यार्थी सेवा संस्था हिचे अध्यक्ष विनोद गोसावी, सचिव संतोष गुराम यांनी शाळा व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी मास्क, थर्मामीटर, सैनी टायझर, व इतर साहित्याचे वाटप केले. तसेच नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून "श्री संदीप भास्कर परब" हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वर्ग, माजी विद्यार्थी व परीसरातील नागरिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment