माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वृक्षारोपणातून कल्याण वनविभागाने पुन्हा फुलवली वरप येथे वनराई !
कल्याण (संजय कांबळे) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील वरप येथील वनजमीनीवर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतू यांनतर काहीच दिवसांनी येथील झाडे काही समाजकंटकांनी जाळून टाकली होती. त्यामुळे कल्याण वनविभागावर टिकेची झोड उठवली गेली होती. परंतु याला न डगमगता मोठ्या जिद्दीने कल्याण वनविभागाने वरप येथील सुमारे १५ हेक्टर क्षेत्रात वनराई फुलवली असून यामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
कल्याण वनविभागाचे हद्दीत दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. काही भूमाफियांनी राजकीय पुढाऱ्यांच्या आशिर्वादाने ही अतिक्रमणे केली होती. वनविभागाचे काही कर्मचारी यामध्ये सामिल असल्याने भूमाफियांना अधिक बळ मिळत होते. हे कुठेतरी थांबायला हवे म्हणून वरप येथील राधा स्वामी संत्सग चे मागे असलेल्या वनजमीनीवर पॅल्टेशन करुन माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि वनमंत्री सुधीर फडके, पालकमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई, यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतू यानंतर काही दिवसांनी येथील काही झाडे अज्ञात समाजकंटकांनी झाळली होती. त्यामुळे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघिरे यांच्या वर टिकेची झोड उठवली होती. त्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यांनतर त्यांची बदली देखील करण्यात आली होती.
परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना खरी परिस्थिती समजली व त्यांना पुन्हा कल्याण येथेच पाठविण्यात आले. त्यांनी हजर होताच प्रथम वरप येथील वनजमीनीवर वनराई फुलवली. संपूर्ण जागे भोवती तारेचे कुंफन लावले यामुळे मोकाट जनावरांपासून झाडांचे रक्षण होऊन आज हा सुमारे १५ हेक्टर चे क्षेत्र हिरवेगार झाले आहे. टेकडिवर पाण्याची टाकी बसवून पाण्याची सोय केल्याने बारमाही झाडे हिरवीगार असतात यामुळे येथील वातावरण भरपूर आॅक्शिजनयुक्त व आल्हाददायक आहे.
याशिवाय उंबार्णी येथे २१अ येथील ८ हेक्टर वनजमीनीवरील अतिक्रमण हटवून पॅल्टेंशन करून साडेतीन हेक्टर वर आयन, खैर, साग, शिताफळ, बांबू, बहिवा, मोह, काजू, कांचन, आदी झाडे लावली आहेत गुरवली येथील गवत काढून झाडांना वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. तसेच रेवती येथे दे अंत्यत सुंदर पॅल्टेंशन करुन वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण तालुक्यातील नैसर्गिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. भविष्यात उन्हाळ्यात झाडांना जगविण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे आजच्या कोरोनोच्या वाढत्या काळात नैसर्गिक आॅक्शिजन केवळ वन संवर्धनातूनच मिळू शकतो.
No comments:
Post a Comment