पालकमंत्री अदिती तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते माणगांव उपजिल्हा रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे उदघाटन !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पोर्टेबल एक्स-रे मशीन, कोविड पूर्व तपासणी केंद्र व फिरता दवाखाना असलेली अत्याधुनिक व सर्व प्रकारच्या आरोग्य सोयी-सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, अत्यंत प्रगत अत्याधुनिक ईसीजी मशिन चे उद्घाटन आज करण्यात आले. या अत्याधुनिक आरोग्य सोयी-सुविधांचा माणगावकरांना निश्चितच लाभ होईल, कोविड संशयित रुग्ण शोध मोहिमेस मोठा हातभार लागेल व इतर क्षयरोग, न्यूमोनियासदृश्य रुग्ण शोधण्यास देखील मदत होईल, असे प्रतिपादन याप्रसंगी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
यावेळी माणगाव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार ललिता बाबर व अन्य अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment