अनाधिकृत गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या विरोधात कल्याण तहसीलदारांची धडक मोहीम, अनेक गाड्यांवर धाडी, लाखोंचा दंड ?
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुका हद्दीत अनाधिकृत पणे गौण खनिजांची वाहतूक करणे, अतिरिक्त माल भरणे, शासनाचा लाखो चा महसूल बुडवून चोरटी वाहतूक करणाऱ्या विरोधात कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी विशेष मोहीम उघडली असून आतापर्यंत अशी वाहतूक करणारे अनेक ट्रक वर धाडी टाकून त्यांना खोंचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याण तालुक्यात कांबा म्हारळ, टिटवाळा, या परिसरात मोठय़ा प्रमाणात दगड खाणी आहेत. अनेकांनजवळ शासनाची "राॅयल्टी" नसल्याचे कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शहाड, टिटवाळा, कल्याण, गोवेली, चिखनघर आदी तलाठी व मंडल आधिकारी यांची पथके तयार करून पहाटे, कांबा गावाजवळील टाटा पॉवर हाऊस, वरप येथील सिमा रिसाॅट येथे अचानक धाडी टाकून म्हारळ, अंबरनाथ, चिखनघर, टिटवाळा, डोंबिवली, आणि खडकपाडा येथील वाहन मालकांचे ७ ट्रक पकडले. यामध्ये खडी, दगडपावडर, होती एकूण २३,५ब्रास माल जप्त करुन त्यांचेवर सुमारे १३ लाख १८ हजार ५६ रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय अशी अनाधिकृत गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या विरोधात मुळ दंडाच्या ५पट दंड आकारण्यात आला आहे. तसेच एकदा पकडण्यात आलेले वाहन पुन्हा सापडले तर पाचपट दंड तर आकारला जाईल च पण अशा वाहनांचा लिलाव देखील करण्यात येईल असा इशारा कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे. त्यामुळे सध्या गौण खनिजांची अनाधिकृत व अतिरिक्त वाहतूक करणाऱ्या चे काही खरे नाही असेच म्हणावे लागेल. तसेच जे नियमानुसार वाहतूक करतात त्यांना आमच्या पथकाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे ही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment