गणेश हिरवे उभयतांनी आपल्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. शिक्षिका योगिता हिरवे व शिक्षक गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व यांनी आपल्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना साखर, चहापावडर, साबण, तेल व मास्क, व्हँसलीन डबा अन्य आवश्यक साहित्य भेट म्हणून दिले. त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात यापुर्वीही दिला आहे.आज दि.२ डिसेंबर २०२० रोजी लग्नाच्या १५ व्या वाढदिवसानिमित ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल/मदिना मस्जिद येथे गरजूंना देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. योगिता हिरवे,गणेश हिरवे या उभयतांनी आपल्या लग्न वाढदिवसानिमित जेष्ठ नागरिकांना मदत देण्याच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे जेष्ठ नागरिकांकडून आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.
No comments:
Post a Comment