रायगड अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या आराखड्याबाबत पालकमंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : अलिबाग येथे स्थापन होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकामाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या अनुषंगाने राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने, ‘आरसीएफ’च्या महाव्यवस्थापक श्रीमती सुनीता शुक्ला', रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, सा.बां.कोकण विभागाचे मुख्य अभियंता श्री.इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री कु.तटकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक सोयी-सुविधांचा विचार करून वास्तू मांडणी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
संचालक डॉ.लहाने यांनी महाविद्यालय उभारणीच्या दृष्टीने प्रत्यक्ष जागेचा पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment