भारतीय जनता पार्टी कोकण विभाग कामगार आघाडीची रायगडमध्ये बैठक संपन्न !
"कामगारांना सर्वोपत्तरी न्याय देण्याचा बैठकीत निर्णय"
रायगड, प्रतिनिधी : मुंबई-ठाणेतील अनेक कंपन्यां रायगड जिल्हात स्थलांतर झाल्या असून या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करीत आहेत.मात्र येथील कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात येणारा पगार, कामगार कपात,पगार वेळेत न देणे आदी समस्या या कामगार विभागात असल्याने नुकतेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य सहसंयोजक श्री प्रमोदजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.यावेळी कामगारांवर होणारा अन्याय दुर करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या.
मुबई-ठाणेतील अनेक कंपन्यांनी रायगड जिल्ह्यात आपले बस्तान मांडले आहे.यातील बऱ्यात कंपन्या कामगारांवर अन्याय करीत असल्याचे समोर येत आहे.येथील कंपन्यांसाठी जागा देणाऱ्या भुमिपुत्रांना नोकरी न देता डावलले जात आहे.कामगारांचे पगार कपात करुन वेळेवर दिले जात नाही.अनेक बंद पडल्या आहेत मात्र कामगारांना वाऱ्यावर सोडून मोकळे झाले आहे.तर काही कंपनी व्यवस्थापनाने अनेक कामगारांचा पगार अडवून ठेवला आहे.अशा अनेक कंपन्या रायगड जिल्ह्यात असून कामगारांना मेटाकुटीला आणले आहे. दिवसभर काम करुन घेणे मात्र पगाराची वेळ आली की हात वर करणे यामुळे येथील कामगारांवर अन्याय होत असून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोकण विभाग कामगार आघाडीची बैठक नुकतीच पार पडली आहे.कामगारांच्या समस्या लक्षात घेता प्रसंगी अन्यायग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल मात्र न्याय मिळवूनच द्यायचा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
याबैठकीला रायगड जिल्हा उत्तर विभाग पदाधिकारी, कामगार आघाडी,महाराष्ट्र सह संयोजक अँड.श्री . सुनील तिवारी ,कोकण विभागीय प्रभारी ,श्री. विनोदजी शाह , प्रदेश( चिटणीस ) सह संयोजक, संजय पवार , कोकण विभागीय संयोजक (अध्यक्ष) श्री. कमलेशजी राणे , कोकण विभागीय सह संयोजक श्री. महेशजी मोरे , उत्तर जिल्हा संयोजक (अध्यक्ष)जितेंद्रजी घरत व अन्य सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment