मुस्लिम धर्मगुरू सय्यद आवेस अल गिलानी यांना युरोपियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी !
आदर्श भालेराव : भारता मधील सर्व धर्म एक समान मानून आपल्या कार्यात एक वेगळा विक्रम निर्माण करून आपली एक अनोखी ओळख असलेली भारतीय संस्क्रुतीची जपणूक करून बाहेरील देशात भारताची ओळख निर्माण करून श्री सय्यद आवेस अल गिलानी यांनी एक नवा आयाम रचला आहे. महाराष्ट्र तील सामजिक कार्यातून आपली एक नवीन ओळख निर्माण करणारे व धार्मिक क्षेत्रात मुस्लिम धर्म गुरू असलेल्या सय्यद आवेस अल गिलानी डॉक्टरेट मिळविणाऱ्या महाराष्ट्र मधील युवा मध्ये आदर्श व्यक्ती ठरल्या आहेत.
"युरोपियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून यूरोप च्या इंस्टीट्यूट ऑफ द यूरोपियन रोमा स्टडीज् एंड रिसर्च (यूरोप) ने ची नुकतीच श्री सय्यद आवेस अल गिलानी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली."
श्री सय्यद आवेस अल गिलानी याच्या जन्मभूमी मिरज सांगली असून सय्यद आवेस अल गिलानी याच्या वडिलांच नाव मोहम्मद फारूक गिलानी आहे. गिलानी याच्या सामान्य परिवार असून आवेश यांनी आई वडिलांच्या पाठबळाने वडिलांचा सामान्य कीर्तिचा वसा घेऊन सय्यद आवेस अल गिलानी यांनी आपली सामजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात स्वताला झोकून अनेक सामाजिक कार्य करून आपली मिरज येते ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
गिलानी यांनी आपल्या स्वतःच्या हिंमतीने रोजगार, शिक्षण आरोग्य, क्षेत्रात मोठी कामगीरी बळकावली आहे. यासाठी गिलानी यांना अनेक सामजिक संस्था कडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.श्री सय्यद आवेस अल गिलानी यांनी जवाहर हायस्कूल व कनिष्ठ कॉलेज सांगली मिरज येथून केला आहे. व पुढील शिक्षण डिप्लोमा व सिव्हील इंजिनीअरिंग गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर झाला आहे. उच्च शिक्षण अभियांत्रिकी मध्ये बॅचलर विश्वर्वर्य टेक्नॉलॉजी कॅम्पस पाटगाव मिरज येतून करण्यात आला आहे.
सय्यद आवेस अल गिलानी गेल्या 15 वर्षा पासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आपलं सामजिक कार्याची जाणीव लक्षात ठेवून मानवतेला आपले प्रथम कर्तव्य समजून गिलानी सामजिक कार्याची गाडी घेऊन चालत आहे. त्याच्या कार्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अनेक युवाना प्रेरणा मिळाली आहे.
ह्याच्या मानवतेचा लढा पाहून *(गुरू पीर सय्यद अहमद अली शाह कादरी आर ए कोलार)* कर्नाटक मधून मुस्लिम धर्मगुरु ची पदवी देण्यात आली. तसेच बाहेरील देशातून बगदाद शरीफ इराक येथून ही धर्मगुरू ची पदवी मिळाली आहे.
गिलानी यांनी सामजिक क्षेत्रात शिक्षण व आरोग्य व अन्न स्वच्छ पाणी मुळे कोणी वंचित राहून नये म्हणून काही लोकांना घेऊन सन 2020 मध्ये अल-गिलानी फाऊंडेशन चा निर्माण केला आहे अल-गिलानी फाऊंडेशन च्या माध्यमाने संपूर्ण भारतात शिक्षण -रोजगार -आरोग्य- अन्न- व स्वच्छ पाणी प्रत्येक भारतीयाला सहज उपलब्ध होईल यासाठी ना नफा ना तोटा हा उद्दिष्ट घेऊन भारत भर व विशेषतः महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगळं वेगळ्या जागी आपल्या संस्थेचे कार्यालय सुरू करण्याचा वसा गिलानी कुटूंबानी हाती घेतला आहे.
No comments:
Post a Comment