Wednesday, 2 December 2020

मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनी ५००० पत्रकारांची आरोग्य तपासणी करून पत्रकार 'आऱोग्य दिन' म्हणून साजरा करणार : एस एम देशमुख

मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनी ५००० पत्रकारांची आरोग्य तपासणी करून पत्रकार 'आऱोग्य दिन' म्हणून साजरा करणार : एस एम देशमुख


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात आहे.त्या निमित्त गुरूवारी म्हणजे ०३ डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची स्थापना ०३ डिसेंबर १९३९ रोजी झाली होती. काकासाहेब लिमये हे परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक दिग्गज संपादकांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवित परिषदेला शिखरावर नेण्याचे काम केले.
     दरवर्षी ०३ डिसेंबर रोजी राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.यंदा ०३ डिसेंबर हा दिवस आरोग्य दिन म्हणून राज्यभर साजरा केला जात आहे. ०१ ऑगस्ट नंतर राज्यात कोरोना आणि तत्सम आजाराने ४२ पत्रकारांचे बळी गेले आहे. ४०० पेक्षा जास्त पत्रकार पॉझिटीव्ह झाले होते. पत्रकारांचे स्वतःच्या तब्येतीकडे होणारे दुर्लक्ष आणि शासन आणि व्यवस्थापनाची पत्रकारांच्या बाबतची उदासिन भूमिका या पार्श्‍वभूमीवर आपणच आपली काळजी घेतली पाहिजे या जाणिवेतून राज्यातील पत्रकारांची 3 डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
      राज्यातील ३६ जिल्हे आणि ३५४ तालुक्यांपैकी बहुतेक ठिकाणी तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांंच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन कऱण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरांतून एकाच वेळी किमान ५००० पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे. तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ स्थनिक डॉक्टर्स आणि जिल्हा तसेच तालुका शासकीय रूग्णालयांच्या मदतीने ही शिबिरं घेतील. यामध्ये कोरोना चाचण्यांसह अन्य महत्वाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.त्यामुळे राज्यातील पत्रकारांनी या शिबिरांचा सहकुटुंब लाभ घ्यावा असे आवाहन एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प्रशिध्दी प्रमुख अनिल महाजन आदिंनी केले आहे.

No comments:

Post a Comment

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी ! मुंबई, (केतन भोज) : तळा तालुका ...